
अहिल्यानगर : उन्हाळ्यात पाण्याचे योग्य नियोजन करावे लागेल. पाण्याची मागणी वाढणार असल्याने नियोजनात कोणत्याही चुका होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. सर्व विभागांनी एकत्रितपणे यासाठी काम करावे. रोजचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वॉररुमला येईल, याची खबरदारी घ्यावी. मानवी वस्तीत बिबट्याच्या वाढत्या संचाराचे मोठे आव्हान असून पिंजरे लावूनही बिबटे सापडत नाही. यासाठी ड्रोनचा अधिक वापर करावा.