
राहाता : जिल्ह्यात काही दिवसांत मोठ्या स्वरुपातील पावसाने झालेले नुकसान पाहता स्थायी आदेशाच्या पलिकडे जाऊन मदत करण्याचा विचार करावा लागणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.