राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांचं भान हरवलंय, रघुनाथदादांचा घणाघात

गौरव साळुंके
Monday, 26 October 2020

सत्ताधारी व विरोधी गट एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत सत्तेसाठी काहीही करु शकतात. ते फक्त खिश्याला बिल्ले लावुन मिरवतात.

श्रीरामपूर ः सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेत नाहीत. सद्या शेतकर्‍यांची सर्वत्र लुट सुरु आहेत. काॅग्रेस व राष्ट्रवादीची नेते शेतकरी हिताचे निर्णय घेत आहेत का, असा सवाल करीत कृषी बाजार समिती, साखर कारखाने नेतेमंडळीच्या ताब्यात आहे. त्यामुळे शेतकरी हिताचा निर्णयासाठी सर्वांना संघर्ष करुन आरपारची लढाई करावी लागेल.

सत्ताधारी व विरोधी गट एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत सत्तेसाठी काहीही करु शकतात. ते फक्त खिश्याला बिल्ले लावुन मिरवतात. त्याचे भान हरविल्याची टीका शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी आज येथील शेतकरी मेळाव्यात केली.

मेळाव्याला कालिदास आपेट, शिवाजी नांदखिले, रुपेद्र काले, बाळासाहेब पटारे, तालुकाध्यक्ष अनिल औताडे, युवराज जगताप, अशोक पटारे, शिवाजी जवरे, हरीभाऊ तुवर, नारायण टेकाळे, बच्चू मोढे, विलास कदम, शरद आसने, बबन उघडे उपस्थित होते.

यावेळी मेळाव्याला उपस्थित शेतकऱ्यांनी एकजुठीची शपथ घेतली. पाटील म्हणाले, संघटना स्व. शरद जोशी विचारधारेची संघटना आहेत. त्यांच्या विचारधारेतून सर्वांना प्रेरणा मिळते. जागतिक पातळीवर मदत मिळण्याची भुमिका तत्कालीन काॅग्रेसने घेतली होती. हेच आता भामटे कृषी कायद्याला विरोध करतात. माथाडी कामगारचे नेते नरेंद्र पाटील, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे नेते असुन कायद्याला विरोध करतात. 

त्यामुळे पाच हजार शेतकरी साखर आयुक्तालयावर चला, तुम्हाच्या ऊसाला चार हजार दोनशे रुपये भाव मिळून देतो. आणि आंदोलन उभे करुन सातबारा कोरा करुन देण्याची अशी ग्वाही पाटील यांनी मेळाव्यात दिली. राज्यात सद्या राजकीय संघटनेच्या टोळ्या जमल्या असुन त्यांच्यापासून दुर राहायला पाहिजेत.

बड्या नेतेमंडळीचा डोळा आकारी पडीत जामीनीवर असल्याने वडिलेपार्जित हक्काच्या जामीनी ताकदीशी मिळुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. संघटनेसाठी अनेकांनी रक्त सांडले असुन शेतकर्‍यांनी एकत्र येवुन ताकद उभी कराण्याची गरज आहे. नाशिक जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने संघर्ष उभा करुन जिल्ह्यात आजवर आठ मका खरेदी केंद्रे सुरु केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

अॅड. अजित काळे म्हणाले, केंद्राने नव्याने पारित केलेल्या शेतमाल नियमन मुक्ती कायद्यात अनेक तुटी आहेत. शेतमाल निर्यातबंदीमुळे शेतकर्‍यांना हमीभाव मिळणे शंकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. मेळाव्यात स्वाभिमानीचे ईश्वर दंरदले, शेतकरी संघटनेचे अहमदभाई शेख यांच्यासह विविध शेतकर्‍यांनी शेतकरी संघटनेत प्रवेश केला.
संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raghunathdada's criticism of Raju Shetty and Sadabhau Khot