

Leopard Attack in Rahata Farmer Battles Wild Animal and Escapes Serious Injury After Midnight Encounter
sakal
राहाता: रात्री साडे दहाची वेळ, शेतात सर्वत्र नीरव शांतता. लघुशंका करण्यासाठी रमेश पवार घराबाहेर आला आणि ध्यानीमनी नसताना बिबट्या त्याच्यावर झेपावला. क्षणाचाही विलंब न लावता त्यांना बिबट्याचा एक पाय हातात धरला आणि सर्वशक्तीनिशी त्याच्या छातीवर जोरदार बुक्का मारला. असा जोरदार प्रतिकार होईल, असे बिबट्याच्याही ध्यानीमनी नव्हते. प्रतिहल्ला सुरू झाल्याने त्याने क्षणार्धात धूम ठोकली.