Rahul Jagtap Joins NCP : राहुल जगताप, राजेंद्र नागवडे पुन्हा येणार एकत्र; एकत्रितपणे करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
Ahilyanagar Politics Update : आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी राहुल जगताप सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून रंगत होत्या, तर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला (अजित पवार) सोडचिठ्ठी देत शिवसेनेची मशाल हाती घेतलेले नागवडे कुटुंब पूर्ण एकदा राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत होती.
Rahul Jagtap, Rajendra Nagwade to Join NCP Togetheresakal
श्रीगोंदे : माजी आमदार राहुल जगताप व नागवडे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे दोघे बुधवार २८ राेजी एकत्रितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. या प्रवेशाने पुन्हा जगताप-नागवडे हे पाचपुते विरोधक पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत.