

FDA suspends the food business registration of the bakery unit at Mahatma Phule Agricultural University in Rahuri over food safety and hygiene violations.
esakal
राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अन्न विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या ‘बेकरी युनिट’मध्ये अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेसह स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनातर्फे कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे. या बेकरीचा अन्न व्यवसाय नोंदणी परवाना निलंबित करण्यात आला आहे. त्रुटी पूर्ण करेपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत हा परवाना निलंबित असणार आहे. एफडीएच्या पथकाने वारंवार तपासणी करूनही त्रुटींची पूर्तता न केल्याने ही कारवाई करण्यात आली.