कृषि विद्यापीठाचे ४ टन कांदा बियाणे विक्री; ६.७ टन कांदा बियाणे अद्याप शिल्लक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahuri Agricultural University Sale of 4 Tons Onion seeds 6 tons leftover ahmednagar

कृषि विद्यापीठाचे ४ टन कांदा बियाणे विक्री; ६.७ टन कांदा बियाणे अद्याप शिल्लक

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कांदा बियाण्याची विक्री ऑनलाईन पोर्टलद्वारे दोन दिवसापूर्वी सुरु केली आहे. कृषी विद्यापीठाने विकसीत केलेले कांद्याचे फुले समर्थ आणि बसवंत ७८० या वाणांना शेतकर्यांची प्रथम पसंती असल्याने या वर्षी विद्यापीठने १०.७ टन (१०७ क्विंटल) कांदा बियाण्याचे उत्पादन घेतलेले आहे. पहिल्या दिवशी २.५ टन कांदा बियाण्याची ऑनलाईन विक्री झाली आहे. दुसर्या दिवशी १.५ टन कांदा बियाण्याची विक्री झाली असून ६.७ टन कांदा बियाणे शिल्लक आहे. राज्याच्या काही भागात अजून पावसाने हजेरी लावली नसल्याने शेतकरी कांदा बियाणे खरेदिकडे वळालेले नाही. आत्तापर्यंत झालेल्या ऑनलाईन विक्रीमध्ये अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगांव, मालेगांव, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, औरंगाबद, बीड, अकोला, रत्नागिरी, ठाणे, या जिल्ह्यांतील शेतकर्यांनी कांदा बियाणे खरेदी केले आहे.

कांदा बियाण्यांसाठी ज्या शेतकर्यांनी ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करुन पैसे भरलेले असतील अशा शेतकर्यांना हे बियाणे त्यांनी दिलेल्या पर्यायानुसार कृषि विज्ञान केंद्र, धुळे, कृषि विज्ञान केंद्र, बोरगांव, पिंपळगाव बसवंत संशोधन केंद्र आणि राहुरी कृषि विद्यापीठाच्या विक्री केंद्रावर उपलब्ध होईल. ज्या शेतकर्यांनी कांदा बियाणेसाठी फुले अॅग्रोमार्ट पोर्टलवर नोंदणी केलेली आहे व नोंदणीवेळी जे कागदपत्रे पोर्टलवर जमा केले आहे त्या कागदपत्रांची झेरॉक्स आणि पैसे भरल्याची पावती बियाणे घेतांना विक्री केंद्रावर जमा करणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त शेतकर्यांनी कांदा बियाणे खरेदी करण्याचे आवाहन संचालक संशोधन डॉ. शरद गडाख आणि बियाणे विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके यांनी केले आहे.

Web Title: Rahuri Agricultural University Sale Of 4 Tons Onion Seeds 6 Tons Leftover Ahmednagar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top