.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
राहुरी : विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना १५०० रुपयांची भेट मिळाली आणि महायुतीला घवघवीत यश मिळाले. यामुळे पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाले. सरकार बनल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरमध्ये भेट मिळाली नाही. मात्र विजयात मोलाचा वाटा उचललेल्या राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबरचा १५०० रुपयांचा हप्ता देण्यास सुरवात झाली आहे.