राहुरी: विवाहितेच्या छळप्रकरणी, पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा

पैशांसाठी विवाहितेचा छळ, पतीने आणखी दोन लग्न केले. सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Rahuri
Rahurisakal

राहुरी: निंभेरे (ता. राहुरी) येथे एका विवाहितेला, घर बांधण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये आणावेत, यासाठी शारीरिक, मानसिक छळ करून घरातून हाकलून दिले. पतीने इतर दोन तरुणींशी लग्नगाठ बांधून फसवणूक केली. याप्रकरणी पत्नीच्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rahuri
स्वराज्य ध्वज यात्रा पेमगिरीमध्ये दाखल; ध्वजरथाचे जोरदार स्वागत

विजय ऊर्फ गणेश विठ्ठल नागरे, सखूबाई विठ्ठल नागरे, विठ्ठल कारभारी नागरे, सोनल गणेश शेळके, गणेश विठ्ठल शेळके, गणेश भाऊसाहेब सांगळे (सर्व रा. निंभेरे) अशी आरोपींची नावे आहेत. सविता विजय नागरे (वय २४, रा. निंभेरे) यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की सन २०१३ मध्ये विजय नागरे याच्याशी विवाह झाला. सुरवातीचे काही दिवस व्यवस्थित नांदविले. अडीच वर्षांची एक मुलगी आहे. सन २०१५ मध्ये पती, सासू, सासरे यांनी गायी घेण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये आणण्यास सांगितले.

त्याप्रमाणे पैसे आणून दिले. काही दिवसांनी पुन्हा गाडी घ्यायला एक लाख रुपये माहेराहून आणायला सांगितले. तेही दिले. पुन्हा घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये आणावेत म्हणून शारीरीक व मानसिक छळ केला. घरातून हाकलून दिले. दरम्यान, पती विजय याने अलका तांदळे (रा. शेवगाव), त्यानंतर अक्षदा घुगे (रा. संगमनेर) या दोन तरुणींशी लग्न केले, असेही फिर्यादीत म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com