esakal | स्वराज्य ध्वज यात्रा पेमगिरीमध्ये दाखल; हिंदवी स्वराज्याचा इतिहास सर्वदूर पोचवण्यासाठी यात्रा
sakal

बोलून बातमी शोधा

Swarajya Dhwaj Yatra

स्वराज्य ध्वज यात्रा पेमगिरीमध्ये दाखल; ध्वजरथाचे जोरदार स्वागत

sakal_logo
By
सकाळ वृत्त सेवा

संगमनेर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वराज्य ध्वज यात्रेच्या दुसऱ्या दिवशी, दुपारी संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर स्थानिक ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी या ध्वजरथाचे जोरदार स्वागत केले.

हिंदवी स्वराज्याचा इतिहास सर्वदूर पोचवण्यासाठी यात्रा

कर्जत मधील संत गोदड महाराजांच्या मंदिरातून गुरुवार (ता. 09) रोजी आमदार रोहीत पवार यांच्या हस्ते या ध्वजयात्रेस प्रारंभ झाला होता. तेथून जुन्नर तालुक्यातील शिवनेरी, लेण्याद्री व विघ्नेश्वराच्या दर्शनानंतर या ध्वजरथाने संगमनेर तालुक्यातील पेमगिरीच्या गडावर प्रवेश केला. शहाजी महाराज आणि जिजामाता यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या या किल्ल्यावरील पेमाईमातेचे दर्शन घेण्यात आले, स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थांनी ध्वजरथाचे पूजन केले. सर्व जातीधर्माचे प्रतिनिधीत्व करणारा 74 मीटर जगातील सर्वाधिक उंचीचा भगवा ध्वज व हिंदवी स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाची माहिती सर्वदूर पोचवण्यासाठी ही यात्रा पुढील 37 दिवस चालणार आहे. महाराष्ट्रासह देशातील प्रमुख संतपीठे, शौर्यपीठे, धार्मिक पीठांमध्ये 74 ठिकाणी या सर्वसमावेशक ध्वजाचे प्रातिनिधीक पूजन करावे ही या प्रवासामागील भावना आहे. त्यासाठी 6 राज्यांतून 12 हजार किलोमीटर प्रवास होणार आहे.

हेही वाचा: ‘लोकायुक्त’साठी अण्णा हजारे आक्रमक; राज्य सरकारला दिला अल्टिमेटम

पेमगिरी येथे राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, मिलिंद कानवडे, सुरेश गडाख, राहुल वर्पे, अमोल राऊत, अक्षय भालेराव, प्रदीप शेटे, राहुल राऊत, संकेत कोल्हे, मनीष माळवे, अशोक कानवडे, अर्चना वनपत्रे, रावसाहेब डूबे, सरपंच द्वारका डूबे, सोमनाथ गोडसे आदींच्या उपस्थितीत स्वराज्य ध्वजाचे पूजन करण्यात आले.

हेही वाचा: राज्यातील साखर कामगारांना 12 टक्के पगारवाढ मंजूर!

loading image
go to top