
राहुरी : मुळा धरणात आज सायंकाळी सहा वाजता पाणीसाठा १० हजार २१९ दशलक्ष घनफूट (३९.३० टक्के) झाला. लहित खुर्द (कोतुळ) येथे नदीपात्रातून १० हजार ७३८ क्युसेकने धरणात नवीन पाण्याची आवक सुरू आहे. मागील वर्षाच्या तुलनेत आजच्या दिवशीचा धरणसाठा एक हजार दशलक्ष घनफूट जास्त आहे. त्यामुळे, सलग चौथ्या वर्षी यंदाच्या हंगामात धरण पूर्ण क्षमतेने भरून, ओसंडून वाहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या २६ टीएमसी साठवण क्षमतेच्या मुळा धरणात यंदाच्या हंगामात नवीन दोन टीएमसी पाणी जमा झाले आहे. धरणाच्या पाणलोटात हरिश्चंद्रगडावर मागील सहा-सात दिवसांपासून दररोज कमी-अधिक प्रमाणात पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे, धरणात नवीन पाणी झपाट्याने जमा होत आहे. येत्या आठवडाभर पावसाची अशीच कामगिरी राहण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. अंदाज तंतोतंत खरा ठरला तर येत्या आठवडाभरात धरणसाठा ५० टक्क्यांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.
मागील पाच वर्षांत सन २०१८ चा अपवाद वगळता, धरण पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे यंदा धरण भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मुळा धरणामुळे राहुरी, नेवासा, पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील ८५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. लाखो शेतकऱ्यांचा प्रपंच अवलंबून आहेत. धरणाच्या पाण्यावर दक्षिण नगर जिल्ह्याची अर्थव्यवस्था मजबूत होते. पिण्याच्या पाणी योजना व औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा यामुळे मुळा धरण दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी ठरली आहे. त्यामुळे ''मुळा''तील पाण्याकडे सर्वांचे लक्ष वेधले असते.
मागील वर्षी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी जलसंपदा खात्याला मार्गदर्शन करून सिंचनाचे व्यवस्थित नियोजन केले. माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे वांबोरी व भागडा चारीच्या आवर्तनाची व्यवस्थित नियोजन केले. त्यामुळे, सुमारे दोन टीएमसी पाण्याची बचत होऊन, यंदाच्या वर्षासाठी त्याचा लाभ झाला.
धरणसाठा
(दशलक्ष घनफूट) मागील पाच वर्षांत आजच्या (११ जुलै) दिवशीचा
२०१८-१९ ४,७३९
२०१९-२० ५,०८३
२०२०-२१ ८,५३५
२०२१-२२ ९,२३३
२०२२-२३ १०,२१९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.