राहुरीत मंत्री तनपुरेंचाच बोलबाला, असा लागला निकाल

विलास कुलकर्णी
Tuesday, 19 January 2021

राहुरी महाविद्यालयात आज सकाळी एकाच वेळी 20 टेबलांवर मतमोजणी सुरू झाली. एकूण नऊ फेऱ्यांमध्ये मोजणी प्रक्रिया झाली.

राहुरी : तालुक्‍यातील 44 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेच्या महाविकास आघाडीने 31 ग्रामपंचायतींवर घवघवीत यश मिळविले.

भाजपने आठ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले. त्यांत आमदार राधाकृष्ण विखे पाटील व कर्डिले गटाच्या प्रत्येकी चार ग्रामपंचायतींचा समावेश आहे. स्थानिक आघाड्यांच्या ताब्यात 5 ग्रामपंचायतींची सूत्रे मतदारांनी सोपविली. 

राहुरी महाविद्यालयात आज सकाळी एकाच वेळी 20 टेबलांवर मतमोजणी सुरू झाली. एकूण नऊ फेऱ्यांमध्ये मोजणी प्रक्रिया झाली. पहिल्या फेरीपासून महाविकास आघाडीने विजय मिळविण्यास सुरवात केली. वांबोरी, उंबरे, राहुरी खुर्द, कात्रड, सात्रळ, खडांबे बुद्रुक येथे सत्तांतर झाले.

काही ठिकाणी तनपुरे गटात; काही ठिकाणी विखे पाटील गटातच मैत्रीपूर्ण लढती झाल्या. काही ठिकाणी तनपुरे, विखे व कर्डिले गटांचे कार्यकर्ते एकत्र आले. त्यांच्या विरोधात उमेदवारी नाकारलेल्या नाराजांचे स्वतंत्र मंडळ होते. 

हेही वाचा - माजी आमदार कर्डिलेंनी परतवले पुतण्याचे आव्हान, सुनेचाही केला पराभव

कर्डिले गटाचे भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी गणेगावात वर्चस्व राखले. रामपूर येथे रावसाहेब साबळे, गुहा येथे सुरेश वाबळे यांच्या गटाने सत्ता राखली. चेडगावात दोन उमेदवारांना समान मते मिळाली. तेथे चिठ्ठीद्वारे विजयी उमेदवार निश्‍चित झाला. तहसीलदार फसियोद्दीन शेख, नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी निवडणूकप्रक्रिया पार पडली. पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी बंदोबस्त ठेवला. 

निकाल असा : महाविकास आघाडी- तांदुळनेर, तांभेरे, वावरथ, जांभळी, खडांबे बुद्रुक, कुक्कडवेढे, वरवंडी, कात्रड, करजगाव, चांदेगाव, बोधेगाव, लाख, चेडगाव, राहुरी खुर्द, मल्हारवाडी, गुहा, पिंप्री अवघड, वळण, कुरणवाडी, केंदळ बुद्रुक, वडनेर, पिंपळगाव फुणगी (शिवसेना), आंबी, अंमळनेर, केसापूर, कोपरे/शेनवडगाव, वांजूळपोई, तिळापूर, चिंचाळे, चिंचविहिरे, वांबोरी. भाजप- सात्रळ, कणगर, गुंजाळे, वरशिंदे, संक्रापूर, दवणगाव, रामपूर, गणेगाव. स्थानिक आघाडी- कोळेवाडी, धानोरे, बाभूळगाव, उंबरे, पाथरे खुर्द. 

तालुक्‍यातील 44 ग्रामपंचायतींचे विजयी उमेदवार असे : 

कात्रड : ऋषिकेश घुगरकर, उषा निकम, लता पठारे, आसाराम ससाणे, बाबासाहेब शिंदे, शैला सत्रे, बाबासाहेब तांबे, आश्‍लेषा ठाणगे, शारदा दांगट, संदीप निकम, सुनीता पागिरे, शरद दांगट, रंगूबाई ठाणगे. 

पिंपळगाव फुणगी : शिवाजी जाधव, सुनीता वडितके, रोहिणी नान्नोरे, तुषार फुणगे, हरिभाऊ तोरे, सुनीता जाधव, रामभाऊ वडितके, नंदा जाधव, सुनीता वर्पे. 

वळण : एकनाथ खुळे, विमल रंधे, शोभा आढाव, संजय शेळके, अशोक कुलट, ललिता आढाव, सुरेश मकासरे आशाबाई खुळे, सुभाष ठाकर, पूजा फुणगे, लीलाबाई गोसावी. 

कुरणवाडी : शक्तिमान गायकवाड, भीमाबाई खिलारी, संगीता डव्हाण, सुनील खिलारी, वैशाली खिलारी, अण्णासाहेब खिलारी, सविता खिलारी. 

मल्हारवाडी : मच्छिंद्र गावडे, मंदाकिनी गावडे, रूपाली जाधव, भीमाबाई गागरे, अर्चना सागर, सुशीला गाडे, मंगेश गाडे. 

केसापूर : सचिन टाकसाळ, ज्योती गायकवाड, सुशीला मेहेत्रे, बाबासाहेब पवार, आरती भगत, मीनाक्षी मेहेत्रे, अनिल बोधक, गुलाब डोखे, कांचन रणदिवे. 

दवणगाव : गोकुळदास साळुंके, शिवाजी खपके, पार्वतीबाई जऱ्हाड, राजेंद्र खपके, अर्चना होन, सुमन मोहटे, प्रदीप भोसले, शीतल खपके, सुवर्णा होन. 

संक्रापूर : संजय जाधव, हिराबाई जगताप, शकिला शेख, सुरेश पवार, मीराबाई पांढरे, रामदास पांढरे, वैशाली चव्हाण. 

रामपूर : राजेंद्र खळदकर, जयश्री मोरे, शोभा शिंदे, राहुल भोसले, राहुल साबळे, मीना मोरे, प्रमोद नालकर, मयूरी पठारे, रेणुका साबळे. 

चेडगाव : भाऊसाहेब शिंदे, अनिता तरवडे, चंद्रकला तरवडे, नंदा दीपक ताके, लता जाधव, मुक्ताबाई जाधव, संजय खरात, कैलास तरवडे, वृषाली तरवडे. 

तांदुळनेर : राहुल निमसे, नबाबाई बेलकर, गंगूबाई मुसमाडे, भगवंत साबळे, स्वाती साबळे, बाळासाहेब शिंगोटे, साधनाबाई शिंगोटे. 

पाथरे खुर्द : अजितकुमार धुळे, श्रीधर जाधव, नीता घारकर, सचिन काळे, गंगूबाई जाधव, मनीषा जाधव, शरद पठारे, मनीषा गावडे, हिराबाई टेकाळे. 

आंबी : रावसाहेब फुलमाळी, गणेश कोळसे, मंगल जाधव, संदीप साळुंके, यमुनाबाई कोळसे, स्मिता लोंढे, विजय डुकरे, संगीता साळुंके, उज्ज्वला डुकरे. 

अंमळनेर : नंदकुमार जाधव, उज्ज्वला साळुंके, पुष्पा साळुंके, किरण कोळसे, अरुणा जाधव, रोहन जाधव, प्रीती पाळंदे. 

वांजूळपोई : श्रीरंग पवार, माधव चव्हाण, सुवर्णा पवार, आप्पासाहेब गुरसळ, लक्ष्मीबाई माळी, मुक्ता डोंगरे, वैशाली जाधव, लोचनाबाई पवार, सविता कोळपे. 

गुहा : बबन कोळसे, ऋतुजा कोळसे, प्रीती कोळसे, बबन वर्पे, मनीषा ओहोळ, राम बर्डे, अरुणाबाई ओहोळ, रवींद्र शिंदे, रवींद्र उऱ्हे, उषा चंद्रे, नीलेश ओहोळ, पूनम कोळसे, शकिला सय्यद. 

तांभेरे : सागर मुसमाडे, लक्ष्मीबाई मुसमाडे, सुषमा मुसमाडे, उमेश मुसमाडे, कल्पना हुडे, सरिता शेलार, किशोर तांबे, पूनम शेलार, नितीन गागरे, सुजाता मुसमाडे, मनीषा कांबळे. 

कणगर : भाऊसाहेब आडभाई, बाबासाहेब गाढे, अश्विनी घाडगे, धनंजय बर्डे, मंदाकिनी घाडगे, जुबेदाबी इनामदार, सर्जेराव घाडगे, छाया गाढे, अर्चना घाडगे, बाळासाहेब गाढे, सीमा घाडगे, रामदास दिवे, मनीषा दिवे. 

वावरथ : सविता बाचकर, कोमल जाधव, वसाबाई दुधवडे, रावसाहेब केदार, शारदा जाधव, अरुणाबाई बाचकर, भागा पवार, गणू बाचकर, प्रतिभा बाचकर. 

जांभळी : शकुंतला बाचकर, ताराबाई मधे, सुंदराबाई भुतांबरे, शत्रू पवार, आदिका बाचकर, सुनील मधे, आस्मा शेख. 

वरवंडी : भाऊसाहेब कोळेकर, शकुंतला पवार, जगदीश भालेराव, पप्पू बर्डे, दीपाली बरे, सलीम शेख, प्रियंका त्रिभुवन, मुन्नाबाई परदेशी, ईश्वर अडसुरे, सुवर्णा कदम, आशाबाई ढगे. 

बोधेगाव : रामचंद्र माळवदे, पूजा लावर, योगिता शिंदे, किशोर शिंदे, संध्या पवार, रामदास रजपूत, प्रतिभा शिंदे. 

चांदेगाव : बाळासाहेब बर्डे, मधुकर शिंदे, सुनीता कोतकर, नवनाथ वायदंडे, जया गायकवाड, निर्मला भांड, दत्तात्रेय खर्डे, सुनीता खर्चन, वैशाली माळवदे. 

उंबरे : बापूसाहेब दुशिंग, विजयाबाई ढोकणे, सारिका ढोकणे, सुरेश साबळे, कैलास अडसुरे, सुनीता वाघ, साहेबराव गायकवाड, आदिनाथ पटारे, सुवर्णा पंडित, गणेश ढोकणे, सीमा दारकुंडे, ज्योती ढोकणे, संजय अडसुरे, रतनबाई ढोकणे, नीता ढोकणे. 

चिंचाळे : एकनाथ जाधव, सतीश बाचकर, पारूबाई जाधव, बापूसाहेब गडधे, लता गडधे, इंदूबाई तिखुले, बाबासाहेब वडितके, तान्हूबाई पवार, आदिती सानप. 

राहुरी खुर्द : पोपट चोपडे, राम तोडमल, मंगल शेडगे, गोरक्षनाथ कटारनवरे, नरेंद्र शेटे, लता माळी, असफखान पठाण, सविता धोत्रे, निर्मला मालपाणी, तुकाराम बाचकर, मीना घोकसे, मनीषा शेंडे, मालती साखरे, प्राजक्ता शेटे, शिवाजी पवार. 

धानोरे : सचिन दिघे, श्वेता दिघे, योगिता दिघे, दिगंबर दिघे, मनीषा ब्राह्मणे, पूजा लांडे, शामू माळी, ज्ञानेश्वर दिघे, प्रतिभा दिघे. 

गुंजाळे : आदिनाथ मोटे, मनीषा नवले, सुभद्राबाई ढगे, संभाजी सरोदे, चंद्रकला चेंडवल, आशा नवले, अविनाश हनवत, भारती सरोदे, सीमा नवले. 

कुक्कडवेढे : चांगदेव नागदे, हिराबाई तिडके, अर्चना पानसरे, उत्तम बर्डे, अक्षय गटकळ, पद्मावती सोनवणे, दीपक मकासरे, उज्ज्वला चौधरी, छाया येवले. 

पिंप्री अवघड : प्रियंका बर्डे, शिवाजी लांबे, आसराबाई लांबे, अमोल गायकवाड, मीनाक्षी लांबे, परवीनबानो शेख, लहानू ऊर्फ बापू तमनर, ऊर्मिला लांबे, रेखा पटारे. 

लाख : अशोक शेळके, लहानबाई गल्हे, आरिफा इनामदार, अशोक जाधव, योगिता आढाव, सुरेखा खाडे, रामेश्वर जाधव, राजेंद्र शेळके, मुक्ताबाई तुपे. 

वडनेर : हौशाबापू बलमे, जिजाबाई बलमे, लताबाई बाचकर, मच्छिंद्र बलमे, दादा हारदे, ललिता खेमनर, शशिकांत दिवे, लताबाई बलमे, अलकाबाई बलमे. 

वरशिंदे : दीपक वाबळे, आसराबाई नेहे, मोहन वाबळे, सोनाली आहेर, अर्चना वाबळे, आप्पासाहेब नेहे, कलाबाई विधाते. 

केंदळ बुद्रुक : लक्ष्मण तारडे, उज्ज्वला हरिश्‍चंद्रे, सुमन भुसे, विजयकुमार चव्हाण, बेबी तारडे, शैला तारडे, अण्णासाहेब देवरे, गोविंद जाधव, चंद्रकला तारडे. 

करजगाव : शनीफ पठाण, रतनबाई आरंगळे, जयश्री कोतकर, गणेश कोतकर, भारती कोतकर, अण्णासाहेब देठे, सुजाता लोंढे. 

सात्रळ : सोमनाथ अनाप, सागर डुक्रे, छाया शिंदे, सतीश ताठे, वैशाली नालकर, पद्मा शिंदे, रमेश पन्हाळे, कावेरी पलघडमल, परवीन इनामदार, भाऊसाहेब पलघडमल, बाळू पवार, आयनुमा तांबोळी, गणेश कडू, मंगल पलघडमल, जायदाबी तांबोळी. 

चिंचविहिरे : भगीरथ नरोडे, प्रतिभा गिते, स्वाती पठारे, संजय नरोडे, शीतल धांबोरे, सुवर्णा पानसंबळ, सुनील साळवे, सुधीर झांबरे, पुष्पा गिते. 

कोळेवाडी : दीपक लेंभे, सोमनाथ नवले, राणी नंदकर, राहुल वायळ, गंगूबाई वायळ, बबूबाई आंबेकर, जालिंदर घिगे, सारिका वायळ, प्रियंका रणसिंग. 

कोपरे / शेनवडगाव : सतीश साठे, गयाबाई जगताप, झुंबरबाई माळी, शनैश्वर मोरे, द्वारकानाथ जाधव, कविता जाधव, रामराव जगताप, गयाबाई घोडके, प्रियंका जगताप. 

तिळापूर : बापू आघाव, कावेरी जाधव, लताबाई आचपळे, अण्णासाहेब कोळेकर, उज्ज्वला रोठे, सुशीला होडगर, जीवन खरात, सुधाकर जाधव, सुमनबाई काकड. 

खडांबे बुद्रुक : कैलास पवार, कुंदा जठार, शीतल ताकटे, राधिका पवार, विजया लांडगे, बाळासाहेब पवार, भाग्यश्री ताकटे. 

बाभूळगाव : अनिल वाघमारे, मुक्ताबाई गिऱ्हे, सुरेखा थोरात, दत्तात्रेय ससाणे, राजश्री माने, सविता पाटोळे, विक्रम बर्डे, विठ्ठल पाटोळे, रंजना साबळे. 

गणेगाव : विकास कोबरणे, मनीषा कोबरणे, वैष्णवी कोबरणे, प्रमोद कोबरणे, रेखा कोबरणे, शोभा भनगडे, कविता कोबरणे. 

वांबोरी : नवनाथ गवते, तुषार मोरे, संगीता जवरे, सारंगधर पटारे, अश्विनी पटारे, मंगल नागदे, नितीनकुमार बाफना, मंजूषा देवकर, ईश्वर कुसमुडे, गोरक्षनाथ ढवळे, द्वारकाबाई मोरे, ऋषिकेश मोरे, मंदाबाई भिटे, चंद्रकला पटारे, किरण ससाणे, शीतल मकासरे, लता गुंजाळ. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahuri is dominated by Minister Tanpur