
राहुरी : शहरात तनपुरेवाडी येथे बुधवारी (ता.९) सकाळी एका विहिरीत बिबट्या पडलेला आढळला. विहिरीला पाणी असल्याने बिबट्या जखमी झाला नाही. विहिरीतील विद्युत पंपाच्या पाईपच्या आधाराने बिबट्याचा जीव वाचविला. बिबट्याला पाहण्यासाठी विहिरीभोवती नागरिकांनी मोठी गर्दी केली.