Education: मुलांच्या अभ्यासासाठी राहुरी नगरपरिषदेचा वाजणार भोंगा; टीव्ही, मोबाईल दूर सारून तब्बल दीड तास करावा लागणार अभ्यास

Rahuri Nagar Parishad Initiative: राहुरी नगरपरिषदेने विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी दररोज सायंकाळी भोंगा वाजविण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. मोबाईल व टीव्हीपासून दूर ठेवून मुलांना दीड तास स्वअध्ययनाची सवय लावणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
Education

Education

sakal

Updated on

राहुरी : राहुरी नगरपरिषदेचा भोंगा आता मुलांच्या अभ्यासासाठी वाजणार आहे. भोंगा वाजला की नागरिकांनी घरातील टीव्ही, मोबाईल व मनोरंजनाची साधने बंद करून मुलांना अभ्यासासाठी बसवायचे आहे. त्यासाठी दररोज सायंकाळी सात वाजता भोंगा वाजणार आहे. रात्री साडेआठ वाजता दुसरा भोंगा वाजल्यावर अभ्यास संपणार आहे. मुलांनी दररोज किमान दीड तास स्वअध्ययन करावे, यासाठी हा भोंगा वाजणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com