Rahuri : आषाढीच्या पूजेला पांडुरंग योग्य माणसाला बोलवील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sujay vike

राहुरी : आषाढीच्या पूजेला पांडुरंग योग्य माणसाला बोलवील

राहुरी : "पंढरपूरच्या आषाढी यात्रेची पूजा कुणाच्या हस्ते घ्यायची, हे पंढरीचा पांडुरंगच ठरवितो. सर्वांनी निश्चिंत राहावे. पांडुरंग नेहमी योग्य माणसाला आषाढीच्या पूजेसाठी बोलावत असतो." असे सांगत खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी महाराष्ट्रात सत्तांतराचे संकेत दिले.

ताहाराबाद येथे आज (शनिवारी) संतकवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्टच्या पंढरपूर पायी दिंडी प्रस्थान सोहळ्यापूर्वी पालखी पूजन खासदार डॉ. विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र साबळे, उपाध्यक्ष अविनाश कांबळे, भाजपाचे ज्येष्ठ नेते आसाराम ढूस, सूरसिंग पवार, दिंडी प्रमुख नाना महाराज गागरे, सरपंच नारायण झावरे, चांगदेव किनकर, माजी सभापती भीमराज हारदे उपस्थित होते.

खासदार डॉ. विखे-पाटील म्हणाले, "कोरोनामुळे दोन वर्ष दिंडी सोहळा बंद होता. त्यामुळे यंदा मोठ्या संख्येने वारकरी दिंडीत जात आहेत. नगर-मनमाड व नगर-करमाळा रस्त्याचे काम सुरू असल्याने अडथळ्याचा रस्ता बनला आहे. केंद्र शासनाकडून तातडीने तेरा कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे. त्यातून, खोदलेल्या रस्त्यावर मुरुमीकरण करून, दिंडीतील वारकऱ्यांना पायी चालण्यासाठी रस्ता मार्ग सुकर होईल. वारकऱ्यांच्या अपघाताचे प्रमाण कमी होईल. तहाराबाद येथे पालखी मार्गासाठी २५ लाखांचा निधी दिला जाईल." असेही खासदार डॉ. विखे-पाटील यांनी सांगितले.

Web Title: Rahuri Pandurang Right Person Worship Ashadi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top