
राहुरी : राहुरी बसस्थानकाच्या समोर बुधवारी दुपारी १२ वाजता अहिल्यानगर-मनमाड महामार्गावर अर्धा तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. राष्ट्रपुरुषाच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपींना अटक करावी, अशी मागणी करून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यात आला.