
राहुरी : डिग्रस फाटा येथे अहिल्यानगर-मनमाड महामार्गावर खड्ड्यांमुळे एका महिलेचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कारानंतर संतप्त नातेवाईकांनी राहुरी बसस्थानक चौकात आज (ता. ३०) सायंकाळी अचानक अहिल्यानगर-मनमाड महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. रस्त्याच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन पोलिस प्रशासनाला देऊन आंदोलन मागे घेण्यात आले.