esakal | राहुरीत जुगार अड्ड्यावर छापा; आठ जणांना अटक, मोबाईल व दुचाकी जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

Raid on gamblers near bus stand in Rahuri

राहुरी बसस्थानकाजवळ नगर- मनमाड रस्त्याच्या बाजूला एका टपरीच्या आडोशाला मोबाईलवर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली.

राहुरीत जुगार अड्ड्यावर छापा; आठ जणांना अटक, मोबाईल व दुचाकी जप्त

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : राहुरी बसस्थानकाजवळ नगर- मनमाड रस्त्याच्या बाजूला एका टपरीच्या आडोशाला मोबाईलवर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने मंगळवारी (ता. २४) ही कारवाई केली. मोबाईल, दुचाकी व रोख रक्कम असा 78 हजारांचा मुद्देमाल यामध्ये जप्त करुन आठजणांना अटक केली. या कारवाईमुळे जुगार चालकांचे धाबे दणाणले आहेत.

जुगार चालक आनंद शांतीलाल बाफना (वय 36, रा. मेहेत्रे मळा, राहुरी), सागर राजेश पाटील (वय 26, रा. राजवाडा, राहुरी), आकाश मच्छिंद्र जगधने (वय 22), किरण रोहिदास जगधने (वय 22), सनी रावसाहेब जगधने (वय 22, तिघेजण रा. लक्ष्मीनगर, राहुरी), कैलास राजू गायकवाड (वय 27, रा. लोहार गल्ली, राहुरी), शेखर संतोष गायकवाड (वय 24, रा. शनिचौक, राहुरी), रोहन दीपक शिंदे (वय 20, रा. कामगार कॉलनी, राहुरी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. 

श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके व राहुरीचे पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी अवैध धंद्यांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता पोलिस पथकाने बेकायदा जुगार मोबाईलवर खेळतांना अचानक धाड टाकली. आठ जणांना ताब्यात घेऊन, मोबाईल दुचाकी व रोख रक्कम असा 78 हजार 110 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ (श्रीरामपूर) यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राहुरी पोलिसांनी अवैध दारुविक्रीच्या ठिकाणांवर धाडी टाकल्या. दरडगाव थडी नामदेव सोमा बर्डे (वय 45) याच्या राहत्या घराच्या आडोशाला सुरु असलेल्या हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला.

आरोपी बर्डे पसार झाला. वांबोरी येथे सतीश अण्णासाहेब ढवळे याला राहत्या घराच्या आडोशाला देशी-विदेशी दारू विक्री करतांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याकडून 58 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. वांबोरी-धामोरी रस्त्यावर एका हॉटेलवर छापा टाकून दोन हजार रुपये किमतीच्या बिअरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी किशोर कैलास वाघमारे (रा. वांबोरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image