
अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्हाभर छापे टाकून अवैध व्यावसायिकांवर कारवाई केली. अहिल्यानगर तालुका, श्रीरामपूर शहर, नेवासे, श्रीगोंदे, राहुरी अशा २३ ठिकाणी कारवाई करून ३४ आरोपींच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत दोन लाख ८३ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.