esakal | मांडओहळच्या रूईचोंडा धबधब्यात रेल्वे पोलिस बेपत्ता
sakal

बोलून बातमी शोधा

Railway police disappear at Ruichonda waterfall in Mandohal

या परीसरात पोलीसांनी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव न होण्यासाठी पर्यटकांना या ठिकाणी बंदी घातली होती. तरीही पर्यटक पोलिसांना चुकवून या ठिकाणी येतात.

मांडओहळच्या रूईचोंडा धबधब्यात रेल्वे पोलिस बेपत्ता

sakal_logo
By
सनी सोेनावळे

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील मांडओहोळ धरण परीसरातील ओव्हरफ्लो पाण्याने तयार झालेला रूई चोंडा धबधबा पर्यटन परीसरात आज दुपारी फिरण्यासाठी गेलेले गणेश दहिफळे नावाचे नगर रेल्वे पोलीस बेपत्ता झाले आहेत. आज संध्याकाळपर्यंत त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

या बाबत माहीती अशी की,पारनेर तालुक्यातील मांडओहोळ धरणासह रूई चोंडा धबधबा पर्यटन परीसर पर्यटकांना चांगलेच आकर्षित झाले आहे. या परीसरात पोलीसांनी कोरोनाचा प्रादुर्भाव न होण्यासाठी पर्यटकांना या ठिकाणी बंदी घातली होती. तरीही पर्यटक पोलिसांना चुकवून या ठिकाणी येतात.

गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असल्याने या ठिकाणी पाण्याचा प्रवाह देखील मोठा आहे आज दुपारी चारच्या दरम्यान रेल्वे पोलीस जी.आर.पी.पोलीस ठाणे नगर येथील नेमणुकीचे कर्मचारी अनुक्रमे असणारे यु. एल. कोंगे, अे. एम. मुठे, जे एस शेख व बेपत्ता असलेले गणेश दहिफळे हे रूई चोंडा येथे धबधबा पाहण्यासाठी आले होते.

दहिफळे यांना पाण्याचा अंदाज न आल्याने धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात पडले. त्यांना शोधण्याचे काम सुरू झाले. मात्र, रात्र झाल्याने त्यात अडथळा आला. उद्या ही शोध मोहीम सुरू होणार आहे,असे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले.