esakal | सिद्धटेक परिसरात पुनर्वसू बरसले...! अन् शेतकऱ्यांनी केली ऊसलागवड
sakal

बोलून बातमी शोधा

rain in siddhatek

सिद्धटेक परिसरात पुनर्वसू बरसले...!

sakal_logo
By
सचिन गुरव

सिद्धटेक (जि. नगर) : अनेक दिवसांपासून बळीराजाची आभाळाकडे लागलेली नजर अखेर जमिनीवर आली. दिवसभराच्या प्रचंड उकाड्यानंतर गुरुवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेत-शिवारामध्ये चैतन्य पसरले. दीर्घ प्रतीक्षेनंतर पुनर्वसू नक्षत्राच्या पावसात भीमाकाठ न्हाऊन निघाला. (rain-in-siddhatek-farmers-planted-sugarcane-nagar-marathi-news)

पाऊसाने वातावरणाचा नूरच बदलला

पावसाची प्रतीक्षा केल्यानंतरही पाऊस न झाल्याने अखेर शेतकऱ्यांनी ऊसलागवड केली. याच सऱ्यांमध्ये गुरुवारी पावसाचे पाणी साचल्याने त्या तुडुंब भरल्या होत्या. खरिपातील कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, भुईमूग या पिकांसह उसाला मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती. आडसाली उसाच्या लागवडीसाठी अनेक शेतकऱ्यांनादेखील जमिनीत गारवा तयार होण्याची अपेक्षा होती. त्यातच, अनेक भागांत जिरायती पिकेही पावसाअभावी कोमेजून गेल्याने, या भागाला दुबार पेरणीची शिफारस करण्यात आली होती. मात्र, हवामान खात्याने आजच्या पावसाचा व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला आणि पाऊस झाल्याने वातावरणाचा नूरच बदलून गेला.

(rain-in-siddhatek-farmers-planted-sugarcane-nagar-marathi-news)

हेही वाचा: भारतीय संस्कृतीचा मूलाधार देशी गाय; गायीची माता म्हणून पूजा

हेही वाचा: मन आनंदी ठेवण्यासाठी करा या पाच सुत्रांचा वापर

loading image