
अकोले : भंडारदरा व निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून, आज रोजी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ९७१४ दक्षलक्ष घनफूट (८८ टक्के) झाल्याने, तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान चांगल्या प्रकारे होत आहे. जलाशय परिचलन सूचीनुसार पाणीपातळी नियंत्रित ठेवणेकरिता भंडारदरा धरणातून स्पील वे गेटमधून ८९२५१ क्यूसेक पाणी सोडण्यात आले. निळवंडे धरणात पाणी जमा होत आहे. पाण्याची आवक वाढल्यास स्पिल वे गेटमधून ९२५१ क्यूसेक पाणी सोडले, अशी माहिती शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी दिली.