esakal | संगमनेरात पावसाचे तांडवIRain
sakal

बोलून बातमी शोधा

rain

संगमनेरात पावसाचे तांडव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संगमनेर : परतीच्या पावसाने राज्यात जोर धरला असून, आज दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने संगमनेर शहराला सुमारे दीड तास झोडपले. संततधार पावसात शहरातील विविध ठिकाणी कामानिमित्त जाऊन गुंतून पडलेल्या नागरिकांनी समाजमाध्यमावर छायाचित्रे व व्हिडिओ क्लिप अपलोड करून, नगर परिषद व राज्यकर्त्यांविरोधातला रोष प्रतिक्रियांच्या रूपाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा: Lakhimpur : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रांच्या मुलाला अटक

सकाळपासून होत असलेल्या असह्य उकाड्याचा परिणाम दुपारच्या सत्रात झालेल्या पावसाच्या रूपाने दिसून आला. नवरात्रोत्सव व आगामी सणाच्या तोंडावर विविध खरेदीसाठी तालुक्याच्या ग्रामीण भागातून शहरात आलेले नागरिक व स्थानिकही पावसाने अडकून पडले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने केलेल्या उपाययोजना साफ निकामी ठरल्याचे समाज माध्यमावर व्हीडीओ व छायाचित्रात दिसून येत आहे.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बसस्थानक व पूर्वेकडे जाणाऱ्या नवीन नगर रोडचे रूपांतर ओढ्या नाल्यात झाले होते. या शिवाय छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात नेहमीच साचणारे तळे, मालदाड रोड, बाजारपेठ, अमृतवाहिनी बँक, परिसरातील भाजीपाला विक्रेत्यांची धावपळ झाली. शहराच्या विविध प्रभागातील सखल भागात पावसामुळे पाणी साचले होते. शहराच्या ताजणे मळा परिसरातील एका एमआरआय सेंटरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गटाराच्या अर्धवट कामामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यात फसलेली रुग्णवाहिका सोशल मीडियावर व्हायरल झाली.

राज्यकर्त्यांच्‍या दुर्लक्षाच्या बाबी चर्चेत

आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झालेल्या जागृत कार्यकर्त्यांनी प्रश्नांचा भडिमार करून, नगरपरिषदेला जाब विचारला. या निमित्ताने म्हानुटी नदी, लेंडी व नाटकी नाल्याचे नामशेष होणे व पूरनियंत्रण रेषेतील बांधकामाकडे राज्यकर्त्यांचे झालेले दुर्लक्ष आदी बाबीही चर्चेत आल्या.

loading image
go to top