esakal | राजू शेट्टी म्हणाले भाजप-महाआघाडी म्हणजे, 'चोर-चोर मावसभाऊ..' | Ahmednagar
sakal

बोलून बातमी शोधा

Raju shetti

राजू शेट्टी म्हणाले भाजप-महाआघाडी म्हणजे, 'चोर-चोर मावसभाऊ..'

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (जि. अहमदनगर) : भाजप व महाआघाडी म्हणजे ‘चोर-चोर मावसभाऊ, सारे मिळून वाटून खाऊ.’ देशातील मंत्र्यांचे राज्य सरकार, तर केंद्रातील सरकार राज्यातील उपमुख्यमंत्र्यांचे पितळ उघडे पाडत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून त्यांचे हे उद्योग सुरू आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

शेट्टी म्हणाले, की निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी एका बाजूने अस्मानी, तर केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे सुलतानी संकटात सापडला आहे. कोल्हापूर, सांगली भागात उसाला तीन हजार दोनशे रुपये भाव मिळत असताना तुमच्याकडे १७०० ते २१०० रुपये, असा दर दिला जात आहे. याला तुम्हीच जबाबदार आहात. केंद्र सरकारने पूर्वीचा ‘एफआरपी’चे पैसे एकर कमी देण्याचा निर्णय बदलून आता त्याचे तीन तुकडे पाडून कारखानदारांना एक प्रकारे पळवाट दिली आहे. आघाडी सरकार शेवटचा तुकडा एक वर्षानी मिळावा, यासाठी साथ देत आहे. शेतकऱ्यांना लढाई लढावी लागणार आहे. यावेळी हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख, दीपक कर्पे, सुरेश नवले आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुशांत आरोटे यांनी केले. सूत्रसंचालन अमोल उगले यांनी केले.

तीन पायांचे सरकारही सामील

कायदा एकरकमी ‘एफआरपी’ देण्याचा असूनही एक वर्षापासून एकरकमी पैसे देऊ शकलेले नाहीत. तीन तुकडे करून तुमच्या पदरात पैसे कधी पडतील याचा विचार करा. यासाठी राज्यातील तीन पायांचे सरकारदेखील सामील आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.

हेही वाचा: 'छातीवर बसून एफआरपी घेऊ' - राजू शेट्टी

अकोले तालुक्यातील गणोरे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ‘जागर एफआरपीचा व आराधना शक्तिपीठाची’ ही यात्रा आज (बुधवारी) गणोरे येथे आली होती. या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. यावेळी सुरवातीला शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष शुभम आंबरे यांनी स्वगत केले. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय त्र्यंबक आंबरे, पंचायत समिती सदस्य नामदेव आंबरे, सरपंच संतोष आंबरे, किशोर आहेर, दीपक कर्पे, सुशांत आरोटे, शुभम आंबरे, शेतकरी संघटनेचे उत्तर जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे, देवठाणचे सरपंच केशव बोडके, डोंगरगावचे सरपंच बाबासाहेब उगले. सुरेश नवले, चंद्रकांत नेहे, प्रकाश मालुंजकर, सुनील पुंडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: दसरा, दिवाळीसाठी सजली झेंडूची शेती; मंदिरे उघडल्याने मागणीत वाढ

loading image
go to top