अहमदनगर : अध्यक्षपदी राजेंद्र अग्रवाल, दीप्ती गांधी उपाध्यक्ष

बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कृतिआराखडा
बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कृतिआराखडा
बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कृतिआराखडाsakal

अहमदनगर : गेल्या दोन-तीन वर्षांपासून चर्चेत असलेल्या येथील नगर अर्बन बॅंकेच्या निवडणुकीत सुवेंद्र गांधी यांच्या सहकार पॅनलने एकहाती सत्ता मिळविल्यानंतर आज अध्यक्ष-उपाध्यक्षपदांच्या निवडी झाल्या. अध्यक्षपदी राजेंद्र अग्रवाल, तर उपाध्यक्षपदी दीप्ती सुवेंद्र गांधी यांची बिनविरोध निवड झाली.

बॅंकेच्या सभागृहात आज दुपारी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर होते. बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी सूचक म्हणून शैलेश मुनोत, तर अनुमोदक म्हणून दिनेश कटारिया यांनी प्रस्ताव ठेवला. या वेळी सहकार पॅनलचे नेते सुवेंद्र गांधी, सरोज गांधी, नूतन संचालक अजय बोरा, अनिल कोठारी, महेंद्र गंधे, शैलेश मुनोत, संपतलाल बोरा, दिनेश कटारिया, कमलेश गांधी, अशोक कटारिया, राहुल जामगावकर, अतुल कासट, सचिन देसरडा, ईश्वर बोरा, गिरीश लाहोटी, मनेष साठे, संगीता गांधी, मनिषा कोठारी उपस्थित होते. जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, ॲड. राहुल जामदार, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश रोकडे आदींसह विविध क्षेत्रांतील नागरिक यावेळी उपस्थित होते.

बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कृतिआराखडा
जळगाव : हिरापूरजवळ भीषण अपघात; तीन जण जागीच ठार

स्वच्छता मोहिमेने कामाचा श्रीगणेशा

वाढलेला एनपीए कमी करून बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यास प्राधान्य देणार आहे. बँकेच्या प्रगतीसाठी कृतिआराखडा तयार केला असून, त्यानुसारच पुढील कारभार करणार आहे. बँकेला गतवैभव प्राप्त करून (कै.). दिलीप गांधी यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. वसुलीवर अधिक भर देणार आहे. प्रशासक काळात ७० कोटींचे थकीत कर्ज मी वसूल केले आहे. आम्ही कोणताही गैरव्यवहार केलेला नाही, म्हणूनच कर्ज वसूल करू शकलो. उद्यापासून कामास सुरवात करताना सर्वप्रथम बँकेच्या सर्व शाखांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबवून, सर्व शाखा चकाचक करून नव्या उमेदीने काम सुरू करणार आहे, असे बॅंकेचे नूतन अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी सांगितले.

"(कै.). दिलीप गांधी यांच्या कृपाशीर्वादाने मला हे पद मिळाले आहे. त्यांच्या विचाराने काम करून पदाला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे."

- दीप्ती गांधी, उपाध्यक्ष, नगर अर्बन बॅंक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com