esakal | कोपरगावमध्ये भाजपला धक्का! राजेंद्र खिलारींचा समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

rajendra Khilari joins NCP

कोपरगावात राजेंद्र खिलारींचा समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

कोपरगाव (जि. नगर) : भारतीय जनता पक्षाचे माजी तालुका सरचिटणीस राजेंद्र खिलारी यांच्यासह दिगंबर जाधव, आजिनाथ खटकाळे, बबनराव भवर, रमेश खटकाळे, रामभाऊ खटकाळे, विजय भवर, अरुण कर्डक आदी कार्यकर्त्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कोपरगाव शहरातील गौतम बँकेच्या सभागृहात हा प्रवेश झाला. (rajendra Khilari joins NCP with his supporters in kopargaon)

कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार आशुतोष काळे नियोजनबद्ध प्रयत्न करतात. त्यातून प्रलंबित अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत. त्यामुळे आपण त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. दीड वर्षात कोविडच्या साथीचा मुकाबला करीत असतानाही काळे यांनी मतदारसंघाच्या विकासाचा वेग कायम ठेवला आहे. त्यांना विकासाची दृष्टी आहे, अशी प्रतिक्रिया या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

काळे म्हणाले, ‘‘खिलारी हे भाजपचे जुने व अभ्यासू कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. गोदावरी कालव्यांच्या पाणीप्रश्नावर त्यांचा चांगला अभ्यास आहे. त्यांच्या या अनुभवाचा फायदा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी होईल. नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला जाईल. अन्य पक्षाचे अभ्यासू कार्यकर्ते आपल्यासमवेत काम करू इच्छितात, हे पाहून आनंद वाटतो.’’

(rajendra Khilari joins NCP with his supporters in kopargaon)

हेही वाचा: आमदार-पोलिस निरीक्षकांत खडाजंगी; बैठक सोडून जाण्याची सूचना

loading image