

Rajput Killing Case: Nine Taken into Custody for Interrogation
Sakal
श्रीगोंदे: भाऊसाहेब नामदेव रजपूत यांच्या हत्येप्रकरणी त्यांची पत्नी दया भाऊसाहेब रजपूत यांनी श्रीगोंदे पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मुख्य आरोपी महेश किरास चव्हाण याच्यासह इतर दहा आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सहा आरोपींची नावे निष्पन्न झाली आहे. तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर नऊ जणांना चौकशीकामी ताब्यात घेतले आहे.