esakal | दसरा, दिवाळीसाठी सजली झेंडूची शेती; मंदिरे उघडल्याने मागणीत वाढ | Nashik
sakal

बोलून बातमी शोधा

For Dussehra Diwali marigold fields are in full bloom

दसरा, दिवाळीसाठी सजली झेंडूची शेती; मंदिरे उघडल्याने मागणीत वाढ

sakal_logo
By
संदीप पाटील

विराणे (जि. नाशिक) : दसरा व दिवाळी सणांना देशात महत्वाचे स्थान आहे. मोठ्या उत्साहाने दोनही सण घराघरात साजरे केले जातात. दोन्ही सण दरवर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने येत असतात. दोन्ही सणांना झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. दरवाजा, दुकांनाना तोरण, वाहनांना माळ, पुजेसाठी ग्राहक झेंडूच्या फुलांना अधिक पसंती देतात.

अनेक शेतकरी दसरा, दिवाळी सणांना फुले विक्री करता येईल, अशा नियोजनाने झेंडूची लागवड करतात. झेंडू कमी दिवसात येणारे नगदी पिक आहे. खरीप मोसमातदेखील झेंडू लागवडीसाठी उत्पादक झेंडू लागवडीसाठी जमीन रिकामी ठेवतात. दसरा, दिवाळी सणास उत्पादक झेंडू विक्रीसाठी येतात. फुल विक्रेते, फुलभांडारवाले अनेक उत्पादकांकडून गावोगाव फिरून फुले खरेदी करतात. अनेक फुलविक्रेते झेंडूंच्या माळा तयार करून विक्री करतात. सत्तर, ऐंशी रूपये ते दीडशे रूपये प्रतिकिलोने झेंडूची विक्री होत असते. अनेकदा भाव गडगडल्याने झेंडू रस्त्यात फेकूनही उत्पादक निराशेने निघून जातात. यावर्षी चांगला भाव मिळेल, ही उत्पादकांना अपेक्षा आहे. दसरा व दिवाळी पूर्वसंधेला अनेक ठिकाणी झेंडूची शेती सजलेली दिसते.

हेही वाचा: गोड-मधाळ सिताफळांची ग्राहकांना भुरळ; आदिवासींना मिळतोय रोजगार

उत्पादक मोठ्या अपेक्षेने कमी दिवसांचे नगदी पिक म्हणून झेंडूची लागवड करतात. शेतकऱ्यांची कष्ट, मेहनत तसेच सततची संकटे बघता ग्राहकांनी झेंडू खरेदी करताना जास्त चिकित्सक होऊ नये.

- राजेंद्र जाधव, सभापती, मालेगाव

अनियमित पाऊस, वाढता लागवड खर्च, कमी बाजारभाव, मजुरी तसेच शेतकऱ्यांचे अफाट कष्ट आदींचा विचार करता प्रत्येक पिकाला चांगला बाजारभाव मिळालाच पाहिजे.

- पवन ठाकरे, प्रगतिशील शेतकरी, खाकुर्डी

हेही वाचा: आधार कार्ड आता स्वतःलाच करता येईल अपडेट, ही आहे सोपी प्रोसेस

loading image
go to top