

Ralegan Siddhi Health Center, Prakash Abitkar and Anna Hazare
Sakal
पारनेर : राळेगणसिद्धी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीची राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी पाहणी केली. याप्रसंगी उपस्थित ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी संवाद साधला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरज बांगर,तालुका आरोग्य अधिकारी प्रकाश कांबळे, रवींद्र मोरे,विनायक देशमुख,उदयोजक सुरेश पठारे,सरपंच जयशिंग मापारी, लाभेष औटी,दत्ता आवारी, अन्सार शेख, आदी उपस्थित होते.