
जामखेड : जामखेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यासाठी बांधकामाचा प्रस्ताव कृषी उत्पन्न बाजार समितीने सादर केला आहे. या मागणीच्या प्रस्तावास पणन संचालकांनी तातडीने मान्यता द्यावी, असे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले आहेत.