रोहित पवारांच्या विजयासाठी राम शिंदेनी केला होता नवस, ट्विटद्वारे दिली माहिती

अशोक निंबाळकर
Saturday, 9 January 2021

हळगावातील एका महिलेने देवीला नवस केला होता. अकरा नारळाच्या तोरण, दाढी न करण्यापासून ते ५१ रूपयांच्या देणगीपर्यंतचे हे नवस होते.

नगर - ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू रोहित यांनी एंट्री केल्यानंतर कर्जत-जामखेड तालुक्याचे राजकारण देशाच्या केंद्रस्थानी आले. माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्यामुळेही हा मतदारसंघ चर्चेत होता. मात्र, खरी चर्चा झाली ती दोघांत झालेल्या लढतीमुळे. निवडणुकीत रोहित पवार यांच्यासाठी दोन्ही तालुक्यांतील लोकांनी संकल्प सोडले होते. नवससायास केले होते.

पवारांनीही थेट शेवटच्या घटकापर्यंत आपला विकासाचा मुद्दा पोहचवल्याने तो लोकांना भावला. मतदारांची त्यांची ओळख नसतानाही त्यांच्यासाठी स्वतःहून वेगवेगळ्या पैज लावल्या होत्या. कोणी सोळा सोमवार केले. कोणी अंगात शर्ट न घालण्याचा नवस केला.

माझ्या आमदारकीसाठी माझ्यावर प्रेम करणाऱ्या अनेकांनी अनेक गोष्टींचा त्याग केला होता. त्यापैकीच थेरगाव इथले राम बन्सी शिंदे हे एक. निवडणुकीत मला यश मिळावं म्हणून त्यांनी चप्पल घालणं सोडलं होतं. काल त्यांची कृतज्ञतापूर्वक भेट घेऊन नवीन चप्पल दिली आणि त्यांचे आभार मानले. <a href="https://t.co/1oIWxwRGhB">pic.twitter.com/1oIWxwRGhB</a></p>&mdash; Rohit Pawar (@RRPSpeaks) <a href="https://twitter.com/RRPSpeaks/status/1347478146094755843?ref_src=twsrc%5...">January 8, 2021</a></blockquote> <script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>

 

हळगावातील एका महिलेने देवीला नवस केला होता. अकरा नारळाच्या तोरण, दाढी न करण्यापासून ते ५१ रूपयांच्या देणगीपर्यंतचे हे नवस होते. राम शिंदे यांनीही त्यांच्यासाठी नवस केला होता. पवार विजयी होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, असे शिंदे यांनी देवाला साकडे घातले होते.

रोहित पवार यांनीही या नवसाची दखल घेतली. स्वतः चप्पल खरेदी करून थेरगावातील युवकाला भेट दिली आणि त्याचे आभारही मानले.

आमदार पवार यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. पवार सर्वच कार्यकर्त्यांच्या इच्छा वेळ मिळेल तशा पूर्ण करीत आहेत. तालुक्यातील विकासाला चालना मिळेल या भावनेतून लोकांनी पवार यांच्यासाठी नवस केले. पवारही त्यांच्या अपेक्षांची पूर्ती करीत आहेत.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ram Shinde had vowed for Rohit Pawar's victory