Ram Shinde plants over 1,800 rare native trees; a bold step for green Maharashtra and biodiversity conservationesakal
अहिल्यानगर
Ram Shinde Plantation : हरित क्रांतीचा नवा अध्याय : विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, १८७६ दुर्मिळ देशी वृक्षांची लागवड
New Chapter in Green Revolution : एक वृक्ष देशासाठी या प्रेरणादायी उपक्रमांतर्गत आदर्श गाव हिवरे बाजार येथे मातृस्मृती वनमंदिरात रविवारी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते फणस व आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते बेहडा वृक्षाची रोपटी लावण्यात आले.
नगर तालुका : हिवरे बाजार व राळेगणसिद्धी हे भारतातील ग्रामविकासाचे मॉडेल आहेत. देशाचा विकास ग्रामीण भागातूनच शक्य असल्याचे पद्मश्री पोपटराव पवार यांनी आपल्या कार्यातून हे सिद्ध केले आहे. हिवरे बाजार येथील प्रत्येक भेटी वेळी नवीन उत्साह व उर्जा निर्माण होते. याचे अनुकरण इतर गावांनी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.