
कर्जत : स्वप्नातील कर्जत शहर उभे करण्यासाठी मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी राहील. नगरपंचायतीला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिली आहे. कर्जत नगरपंचायतीच्या नूतन नगराध्यक्ष रोहिणी घुले यांचा सभापती शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.