

Shirdi Lok Sabha Race Heats Up as Athawale Signals Political Return
sakal
शिर्डी: शिर्डी हा माझ्यासाठी केवळ एक मतदारसंघ नाही, तर जिव्हाळ्याचा ऋणानुबंध आहे. येत्या काळात योग्य वेळ आल्यावर, महायुतीच्या चौकटीत शिर्डीच्या जनतेची सेवा करण्याची संधी पुन्हा एकदा मिळावी, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे, अशा सूचक शब्दांत समाजमाध्यमावर आपल्या भावना व्यक्त करीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आगामी लोकसभा निवडणूक शिर्डी मतदारसंघातून लढविण्यास आपण इच्छुक आहोत, असा संदेश पुन्हा एकदा दिला.