
अखिल भारतीय वारकरी मंडळाचा नुकताच जेऊर हैबती (ता. नेवासे) येथे पदाधिकारी निवडी व पत्र वाटपाचा कार्येक्रम झाला. त्यात मंडळाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाराज वाळके यांनी नेवासे तालुक्याची वारकरी मंडळ व विविध समित्यांची कार्येकरणी जाहीर केली.
नेवासे : अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या अखिल भारतीय वारकरी मंडळाचा नुकताच जेऊर हैबती (ता. नेवासे) येथे पदाधिकारी निवडी व पत्र वाटपाचा कार्येक्रम झाला. त्यात मंडळाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाराज वाळके यांनी नेवासे तालुक्याची वारकरी मंडळ व विविध समित्यांची कार्येकरणी जाहीर केली. यामध्ये तालुकाध्यक्षपदी श्री क्षेत्र बहिरवाडी येथील रामनाथ महाराज पवार यांची निवड झाली.
अखिल भारतीय वारकरी मंडळाची नेवासे तालुका पदाधिकारी व त्यांची पदे अशी : रामनाथ महाराज पवार (तालुकाध्यक्ष), सुभाष बेल्हेकर (वारकरी शिक्षण समिती प्रमुख), कृष्णा महाराज हारदे (स्वच्छता व व्यसनमुक्ती प्रमुख), बाळासाहेब गाडेकर (सार्वजनिक मंदिर बांधकाम व निधी संकलन समिती प्रमुख), सोमनाथ महाराज गडाख (दिंडी व सप्ताह समिती प्रमुख), नारायण महाराज ससे-(गोपालन व इतर कार्यक्रम प्रमुख), नंदा महाराज गवारे (महिला व बालसंस्कार समिती प्रमुख), कृष्णा महाराज काकडे (युवा समिती प्रमुख), डॉ. संजय सुकाळकर (आरोग्य समिती प्रमुख), अक्षय महाराज उगले (समाजकल्याण समिती प्रमुख), लक्ष्मीनारायण जोंधळे (संपर्क प्रमुख), मंगेश महाराज वाघ (वारकरी शिक्षण समिती उपप्रमुख), राजेंद्र महाराज आसने (स्वच्छता समिती प्रमुख),
नीलेश महाराज कडू (सार्वजनिक मंदिर बांधकाम निधी संकलन उपप्रमुख), लतीफ महाराज शेख (दिंडी व सप्ताह समिती उपप्रमुख), सागर महाराज टेमक (समाजकल्याण समिती उपप्रमुख), माधुरी कुलकर्णी (महिला व बालसंस्कार समिती उपप्रमुख), लक्ष्मण महाराज नांगरे ( युवा समिती उपप्रमुख), डॉ.करणसिंह घुले (आरोग्य समिती उपप्रमुख), भास्कर तारडे (गोपालन समिती उपप्रमुख), शंकरराव तनपुरे (कोषाध्यक्ष), हितेश महाराज आठरे (मुख्य सचिव), भानुदास गटकळ (वारकरी शिक्षण सचिव).
दत्तात्रय महाराज त-हाळ (स्वच्छता समिती सचिव), भगवान महाराज डीके (सार्वजनिक मंदिर बांधकाम सचिव), रविंद्र महाराज काकडे (सप्ताह व दिंडी समिती (सचिव), सुभाष औटी (समाजकल्याण समिती सचिव), उषा शिंदे (महिला व बालसंस्कार सचिव), आकाश महाराज कराळे (युवा समिती सचिव), बाळासाहेब फोलाणे (आरोग्य समिती सचिव), अनिकेत महाराज शिंदे (गोपालन समिती सचिव), तर पत्रकार सुधीर चव्हाण (प्रसिद्धी प्रमुख) अशा निवडी झाल्या आहेत.
या वेळी वारकरी मंडळचे राज्य प्रमुख अतुल महाराज आदमाने, गणेश महाराज डोंगरे, ज्ञानेश्वर माऊली शिंदे, अंकुश महाराज कादे, जयाताई महाराज घाडगे, पंढरीनाथ सोनवणे उपस्थित होते,
संपादन - अशोक निंबाळकर