अडचणीच्या काळात रणजितसिंह देशमुख यांचे काम दिशादर्शक : डॉ. तांबे 

आनंद गायकवाड
Tuesday, 27 October 2020

कोरोना महामारीत दूधव्यवसाय अडचणीत आला असताना, महाविकास आघाडी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रतिदिन अतिरिक्त झालेल्या दहा लाख लिटर दुधाची पावडर बनविण्यासाठी पाठपुरावा करून, रणजितसिंह देशमुख यांनी दूधउत्पादकांना दिलासा दिला.

संगमनेर (अहमदनगर) : कोरोना महामारीत दूधव्यवसाय अडचणीत आला असताना, महाविकास आघाडी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रतिदिन अतिरिक्त झालेल्या दहा लाख लिटर दुधाची पावडर बनविण्यासाठी पाठपुरावा करून, रणजितसिंह देशमुख यांनी दूधउत्पादकांना दिलासा दिला. त्यांचे हे काम "महानंदा'चे अध्यक्ष म्हणून राज्यात दिशादर्शक ठरल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. 

तालुक्‍यातील देवगड (हिवरगाव पावसा) येथे राजहंस दूध संघ, संगमनेर अश्वप्रेमी असोसिएशन व शिवराज्य नवनिर्माण संघटनेतर्फे आयोजित वृक्षारोपण, मास्क व सॅनिटायझरचे वितरण आणि कोरोनायोद्‌ध्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. 
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर होते.

ते म्हणाले, ""समस्त मानवजातीवरील संकट असलेल्या कोरोनाची भीती अद्याप संपली नसल्याने निष्काळजीपणा करू नये. भावनांपेक्षा वस्तुस्थितीला महत्त्व देत, यावरील लस उपलब्ध होईपर्यंत स्वतःबरोबर कुटुंबाची काळजी घेणे, कोविडच्या शासकीय नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त दुधाची पावडर बनविण्याच्या निर्णयामुळे दुग्धोत्पादकांना दिलासा मिळाला. रणजितसिंह देशमुख यांनी देवगड यात्रेमध्ये अश्वबाजार व अश्वप्रदर्शन आयोजित करून देवगडचा राज्यात लौकिक निर्माण केला आहे. दिवंगत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना शक्ती व युक्तीचा वापर समाजहितासाठी करण्याचा मंत्र दिला होता. याचा अद्यापही अवलंब सुरू असल्याने, संगमनेर तालुका ग्रामीण विकासासह प्रगतिपथावर असल्याचे ते म्हणाले. 

लक्ष्मण कुटे, आर. बी. रहाणे, साहेबराव गडाख, संतोष हासे, विलास कवडे, मोहन करंजकर, पांडुरंग सागर, बाबासाहेब गायकर, संतोष मांडेकर, माणिक यादव, उत्तम जाधव, मीनानाथ वर्पे, अण्णासाहेब राहिंज, कैलास पानसरे, भाऊसाहेब जाधव, राजेंद्र देशमुख, योगेश सोनवणे, विलास शिंदे उपस्थित होते. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ranjitsingh Deshmukh work is a guide in difficult times