जानेवारी व फेब्रुवारी २०२४ मध्ये आरोपीने जीवे मारण्याची धमकी देत पीडितेवर वेगवेगळ्या ठिकाणी चारवेळा अत्याचार केला. तसेच ही गोष्ट जर कोणाला सांगितली, तर तुला व तुझ्या वडिलांना मारुन टाकीन, अशी धमकी दिली.
"Accused sentenced to life imprisonment for the horrific rape of a minor girl, ensuring justice for the victim."Sakal
श्रीगोंदे : तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी ऋषिकेश भीमराव ऊर्फ पिमंराव वाळुंजकर (वय २३, रा. जवळके, ता. जामखेड) यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली.