esakal | सोनईतील भाजी मंडईत व्यावसायिकांची रॅपीट अॅन्टीजेन तपासणी

बोलून बातमी शोधा

 rapid antigen test

सोनईतील भाजी मंडईत व्यावसायिकांची रॅपीट अॅन्टीजेन तपासणी

sakal_logo
By
सुस्मिता वडतिले

सोनई (अहमदनगर) : सोनईत सर्वाधिक गर्दीचे ठिकाण म्हणून ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने आज भाजी मंडईतील ४१ व्यावसायिकांची रॅपीट अॅन्टीजेन तपासणी केली. यात कुणीही पाॅझिटिव्ह रुग्ण सापडला नसल्याने ग्रामस्थांच्या मनातील चिंता दूर झाली.

दोन दिवसाच्या विकेंड लाॅकडाऊननंतर सोमवारी (ता.१२) रोजी भाजी मंडईत मोठी गर्दी उसळली होती. हा विषय 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध होताच सरपंच धनंजय वाघ व वैद्यकीय अधिकारी डाॅ. राजेंद्र कसबे यांनी सर्व व्यावसायिकांची रॅपीट अॅन्टीजेन तपासणी करण्याचा निर्णय घेतला. निर्णय जाहीर होताच तीसहून अधिक व्यावसायिकांनी मंडईतून पळ काढला.

कौतुकी नदीपात्रातील मारुती मंदिर परिसरात ४१ व्यावसायिक व शेतक-यांची तपासणी करण्यात आली. सर्व अहवाल निगेटिव्ह आले. यावेळी नितीन दरंदले, संतोष चपळे, सखाराम राशिनकर, सचिन पवार उपस्थित होते. अशीच तपासणी मुख्य पेठेतील कापड दुकानात करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.