esakal | शेवगावात कोणत्या ग्रामपंचायतीवर कोण प्रशासक आहे ते वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Read who is the administrator of which gram panchayat in Shevgaon

प्रशासक म्हणुन नियुक्ती केलेल्या या अधिकार्‍यास सरपंचाचे सर्वाधिकार देण्यात आले. कारभार पाहतांना गैरवर्तन व कर्तव्यात कसूर केल्यास कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना आहेत.

शेवगावात कोणत्या ग्रामपंचायतीवर कोण प्रशासक आहे ते वाचा

sakal_logo
By
सचिन सातपुते

शेवगाव : शेवगाव तालुक्यातील मुदत संपलेल्या ३२ ग्रामपंचायतीवर 
गटविकास अधिकारी यांनी प्रशासक नेमले आहेत. त्यासाठी २० जणांचे नेमणुक आदेश काढण्यात आले आहेत. प्रशासनातील अधिकारी कर्मचा-यांचीच ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्याने राजकीय मंडळींचा हिरमुड झाला आहे. 

अॉगस्ट महिन्यापर्यंत तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतीच्या पदाधिका-यांची पंचवार्षिक मुदत संपली आहे. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर राज्यसरकारने या ग्रामपंचायतीच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकललेल्या आहेत. त्यामुळे सध्या ग्रामपंचायतीचा कारभार या कालावधीत कोण पाहणार यासाठी विदयमान सरपंचासह राजकीय मंडळीमध्ये त्यासाठी शासकीय दरबारी रस्सीखेच चालली होती. मात्र प्रशासनातील अधिकारी व कर्मचा-यांचीच नियुक्ती करण्याचे धोरण शासनाने स्वीकारल्याने जिल्हाधिका-यांनी संबंधीत ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचे सर्वस्वी अधिकार तालुक्याच्या गटविकास अधिका-यांना प्रदान केले. त्यानुसार तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून २० जणांची नियुक्ती गटविकास अधिकारी महेश डोके यांनी केली. त्यातील काही प्रशासकांकडे दोन ते चार ग्रामपंचातीचा पदभार देण्यात आला आहे.

पंचायत समितीतील विस्तार अधिकारी एस.एस. जगताप यांची अधोडी, राणेगाव, शिंगोरी, ठाकुर निमगाव या चार ग्रामपंचायतीवर, शाखा अभियंता जे.ए.पट्टे यांची अंतरवाली बुद्रुक, अंतरवाली खुर्द व सोनेसांगवी या तीन, सहाय्यक गटविकास अधिकारी बी.ए. कासार यांची बक्तरपूर व दहिगावशे या दोन, कृषी विस्तार अधिकारी जी.एम.फाजगे यांची बेलगाव व गदेवाडी, कृषी विस्तार अधिकारी आर.एस.जाधव यांची भावीनिमगाव व चापडगाव, पंचायत समिती कृषी अधिकारी सारंग दुगम यांची बोडखे, विस्तार अधिकारी मल्हारी इसरवाडे यांची घोटण, जुने दहिफळ व कांबी.

हेही वाचा - दक्षिण काशी दहावे, तेरावे अॉनलाईन, कावळाही येते एका क्लिकवर

पंचायत समिती कृषी अधिकारी राहुल कदम यांची कोनोशी, शाखा अभियंता ए.एल.साळवे यांची लखमापूरी,शेकटे बुद्रुक, केंद्रप्रमुख बी.आर.औताडे यांची मळेगाव शे, केंद्रप्रमुख आर. जे. ढाकणे यांची नागलवाडी, शाखा अभियंता मंगेश लिमजे यांची नजिक बाभूळगाव व नविन दहिफळ, केंद्रप्रमुख व्ही. व्ही. हुशार यांची निंबेनांदूर, केंद्रप्रमुख ए.बी. कचरे यांची पिंगेवाडी, विस्तार अधिकारी सचिन भाकरे यांची राक्षी, पर्यवेक्षिका एस.एस.बर्वे यांची सोनविहीर, केंद्रप्रमुख व्ही.एन.गायकवाड यांची सुकळी, पर्यवेक्षिका एस.एस.म्हस्के यांची तळणी, पर्यवेक्षिका एम.आर.बडे यांची ठाकुर पिंपळगाव तर शाखा अभियंता अनिल दहातोंडे यांची वरखेड ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणुन नियुक्ती केली आहे.

प्रशासक म्हणुन नियुक्ती केलेल्या या अधिकार्‍यास सरपंचाचे सर्वाधिकार देण्यात आले. कारभार पाहतांना गैरवर्तन व कर्तव्यात कसूर केल्यास कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना आहेत. या नियुक्त्यांची मुदत पुढील आदेश येईपर्यंत अथवा ग्रामपंचायत निवडणूक होईपर्यंत असणार आहेत.
 

संपादन - अशोक निंबाळकर

loading image