esakal | Reading of Godad Maharaj's book at Karjat

बोलून बातमी शोधा

Reading of Godad Maharaj's book at Karjat
गोदडमहाराज संवत्सरीत कोरोनाविषयी भाकीत
sakal_logo
By
अशोक निंबाळकर

प्रत्येक वर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी कर्जतचे ग्रामदैवत गोदड महाराज यांच्या मंदिरात संवत्सरीचे वाचन केले जाते. त्या नुसार आज कोरोना मिनी लॉकडाऊन असतानादेखील प्रथेप्रमाणे पुजारी, ग्रामस्थ आणि पंच कमिटीच्या अनुमतीने गर्दी टाळीत मोजक्याच पुजाऱ्यासमवेत संत गोदड महाराज मंदिरात पुजारी पंढरीनाथ काकडे यांनी संवत्सरीचे वाचन केले.गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संवत्सरीचे वाचन करताना भावीक भक्तांना बंदी घालण्यात आली आहे. गोदड महाराज यांचे मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. या वर्षी पलवंग संवत्सरी आहे. प्रत्येक वर्षी गोदड महाराज यांच्या संवत्सरीत काय निघतेय हे ऐकण्यासाठी भावीकांचे कान आतुर झालेले असतात. तसेच शेतकरी ग्रामस्थ या वरूनच वार्षिक नियोजन करतात.हे भाकीत तंतोतंत खरे ठरते अशी भाविकांची श्रद्धा आहे.या मध्ये शेतकरी वर्गासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे या वर्षी मान्सूनचे आगमन थोडे उशीरा होईल पण भरपूर पाऊस पडेल.

एप्रिल महिन्याच्या मधयांनानंतर वळवाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. धान्य भरपूर पिकेल, चोर आणि टोळधाड या पासुन त्रास होईल, लोकालोकात कलह वाढेल, रोगराई वाढेल, तेलंग देशी (आखाती)आगी लागतील, युद्धे होतील, राजकारणी लोकांना त्रास होईल. खरीप व रब्बीची पिके मुबलक प्रमाणात पिकतील, एकंदरीत गोदड महाराज यांच्या संवत्सरीत शेतकऱ्यांसाठी शुभ वर्तमान वर्तविण्यात आले आहे. तर आश्विन व कार्तिक महिन्यात देशात अराजकता माजेल, याचा त्रास जनतेला होईल अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे. यावेळी गोदड महाराज यांचे मानकरी मेघनाथ पाटील, पुजारी पंढरीनाथ काकडे, अनिल काकडे, सुरेश ख्रिस्ती, तात्यासाहेब क्षीरसागर यांचे सह मोजके भाविक, भक्त उपस्थित होते.