नगर ः शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने, प्रशासनाने काही भाग कंटेन्मेंट व बफर झोन जाहीर केले आहेत. असे असताना गांधी मैदानातील ऐक्य मंदिरात प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या बैठका सलग तीन दिवस होऊन पदाधिकाऱ्यांची निवड झाली, तसेच सत्कार सोहळाही झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कंटेन्मेंट व बफर झोनमधील नागरिकांना बाहेर पडण्यास प्रशासनाने मज्जाव केला आहे. नियम मोडून बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. शहरातील गांधी मैदान परिसर प्रशासनाने बफर झोन जाहीर केला आहे. याच भागात जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेची मुख्य शाखा आहे.
हेही वाचा ः नगर झेडपी लागली आयुर्वेदिक औषधांमागे...
येथील कार्यालयात पदाधिकारी निवडीसाठी सलग तीन दिवस बैठका होत होत्या. त्यानंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभही झाला. त्याचे फोटोसेशनही करण्यात आले.
बफर झोन असताना परिसरात वाहनांची गर्दी पाहून नागरिकांनी कोतवाली पोलिसांनी माहिती दिली. पोलिस घटनास्थळी आल्यावर शिक्षक नेत्यांसह कार्यकर्त्यांची एकच पळापळ झाली. दरम्यान, बफर झोन परिसरात आलेल्या या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
अवश्य वाचा ः नगर झेडपीची वेबसाई हॅक... अध्यादेशच ठेवले झाकून
जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांची निवडप्रक्रिया झाल्यावर ते बॅंकेत येऊन गेल्याचे बॅंकेचे व्यवस्थापक दिलीप मुरदारे यांनी सांगितले.
गांधी मैदान परिसर बफर झोनमध्ये आहे. तेथे वाहनांची गर्दी झाल्याची माहिती मिळाल्यावर पोलिस पथकाने तेथे जाऊन पाहणी केली. तेथील वाहने कर्मचाऱ्यांची असल्याचे बॅंक व्यवस्थापनाने सांगितले.
- प्रवीण लोखंडे, पोलिस निरीक्षक, कोतवाली
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.