नगर झेडपी लागली आयुर्वेदिक औषधांमागे

Nagar ZP will buy Ayurvedic medicine
Nagar ZP will buy Ayurvedic medicine

नगर ः नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक औषधांचे वाटप करण्याचा निर्णय ग्रामविकास खात्याने घेतला होता. त्यासाठी खरेदीप्रक्रियाही करण्यात येणार होती. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे आता ही खरेदी जिल्हा परिषदांना करण्याचा आदेश दिला आहे.

त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्याच्या (सोमवारी) बैठकीत यावर निर्णय होणार आहे. 
कोरोना संकटात नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाने "अर्सेनिक अल्बम-30' या होमिओपॅथिक औषधांचा वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार, राज्याच्या ग्रामविकास खात्याने नागरिकांना औषधपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

चौदाव्या वित्त आयोगाच्या व्याजातून ही औषधखरेदी केली जाणार आहे. सुरवातीला राज्यस्तरावर खरेदी करून जिल्हा परिषदांना व तेथून गावांना औषधांचा पुरवठा करण्यात येणार होता. मात्र, त्यात तांत्रिक अडचणी आल्यामुळे आता ही खरेदी जिल्हा परिषदांनी करावी, असा अध्यादेश ग्रामविकास खात्याने काढला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदांकडून खरेदीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. 

मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या औषधखरेदी समितीची बैठक उद्या (सोमवारी) होत आहे. त्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्याधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रत्येकाला औषधाचा किती डोस द्यावा लागेल, यासह किती औषधांची खरेदी करायची, याचा निर्णय बैठकीत होणार आहे. 

खरेदी प्रक्रियेसाठी समिती 
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली औषधखरेदीसाठी समिती स्थापन केली आहे. तीत जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी सदस्य आहेत. समितीचे सदस्य सचिव म्हणून ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी काम पाहतील. 

व्याजाची रक्कम भरण्याचा ओघ 
चौदाव्या वित्त आयोगाच्या पैशांच्या व्याजातून ही औषधखरेदी केली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 1318 ग्रामपंचायतींकडून व्याजाचे पैसे भरण्यास सुरवात केली आहे. हे पैसे राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानाच्या खात्यात भरले जाणार असून, तेथून औषधखरेदीसाठी पैसे दिले जाणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com