रेकॉर्ड ब्रेक ः नगर जिल्ह्यात दिवसात ४३ कोरोना रूग्ण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

एकवीरा चौकातील पद्मानगर येथील 75 वर्षीय महिला, श्रीरामपूर येथील 70 वर्षीय महिला, श्रीगोंदे तालुक्‍यातील कोळगाव येथील 55 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

नगर ः जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आज (मंगळवारी) दिवसभरात एकूण 29 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत एकाच दिवशी 29 रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामध्ये नगर शहर, भिंगार व श्रीरामपूर तालुक्‍यातील रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, त्यानंतर रात्री १४जणांचे अहवाल आले. त्यामुळे जिल्ह्यात एकाच दिवसात तब्बल ४२ रूग्ण सापडले.

आज दुपारी प्राप्त झालेल्या अहवालात संगमनेर तालुक्‍यातील कुरण येथे तीन व्यक्‍ती, नगर शहरातील झारेकर गल्लीत 32 वर्षीय व्यक्‍ती, बागरोजा हडको येथे 32 वर्षीय व्यक्‍ती, सुडके मळ्यातील 30 वर्षीय व्यक्‍तीसह 28 वर्षीय महिला, तोफखान्यातील 6 वर्षीय मुलगी, सिद्धार्थनगरमधील 38 वर्षीय पुरुष, माधवनगर (कल्याण रस्ता) येथील 40 वर्षीय महिला बाधित आढळून आली. भिंगारमध्ये कोरोनाबाधित चार रुग्ण सापडले.

हेही वाचा - मुलगाच म्हणतो, आईचे अनैतिक संबंध

यात 35 व 49 वर्षीय पुरुष, तसेच 40 व 38 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. याशिवाय आलमगीर (भिंगार) येथील 30 वर्षीय व्यक्‍ती बाधित आढळून आली आहे. श्रीरामपूर येथील 48 वर्षीय पुरुष, बाभूळवाडी (ता. पारनेर) येथील 62 वर्षीय पुरुष आणि जायभायवाडी (ता. जामखेड) येथील 32 वर्षीय व्यक्‍तीचा बाधितांमध्ये समावेश आहे. आखेगाव (ता. शेवगाव) येथील 30 वर्षीय महिलाही बाधित आढळून आली आहे. 

जिल्हा प्रशासनाला आज सायंकाळी दहा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. यात जामखेडमधील 42 वर्षीय पुरुष, मुंबईच्या परळ भागातून पिंप्री पठार (ता. पारनेर) येथे आलेला 28 वर्षीय पुरुष, राजुरी (ता. जुन्नर, पारनेर तालुक्‍याच्या हद्दीवरील गाव) येथील 36 वर्षीय पुरुष, नगर शहरातील बालिकाश्रम रस्त्यावरील बागवान मळा येथील एकाच कुटुंबातील नऊ वर्षीय मुलगा व 12 वर्षीय मुलगी, चितळे रस्त्यावरील 36 वर्षीय पुरुष, ढवण वस्ती येथील 28 वर्षीय पुरुष, एकवीरा चौकातील पद्मानगर येथील 75 वर्षीय महिला, श्रीरामपूर येथील 70 वर्षीय महिला, श्रीगोंदे तालुक्‍यातील कोळगाव येथील 55 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज दिवसभरात २९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. याशिवाय, पीएमटी लोणी आणि पुण्यातील खाजगी प्रयोगशाळा याठिकाणी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या १४ रुग्णांची नोंद जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्येत करण्यात आली आहे. यामध्ये दाढ (ता. राहाता) ०७, संगमनेर ०१, कोल्हार ०३, मजले चिंचोली (ता.नगर) ०१ आणि सारसनगर (नगर शहर) ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. सारसनगर आणि मजले चिंचोली येथील रुग्ण पुणे येथे उपचार घेत आहेत तर दाढ आणि कोल्हार येथील रुग्ण पीएमटी लोणी येथे उपचार घेत आहेत.

  • जिल्ह्यात अॅक्टिव रुग्णांची संख्या: १४४
  • कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३०७
  • जिल्ह्यातील एकूण नोंद रुग्ण संख्या: ४६५
  • मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या: १४

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Record break: So many corona patients per day in Nagar district