esakal | मोफत पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी ‘या’ लिंकवर नोंदणी करा
sakal

बोलून बातमी शोधा

Registration is required to avail free police pre-recruitment training

मतदारसंघातील शेती सुधारावी, शाश्वत शेतीच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळावे.

मोफत पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी ‘या’ लिंकवर नोंदणी करा

sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड (अहमदनगर) : मतदारसंघातील शेती सुधारावी, शाश्वत शेतीच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळावे. महिलांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी आई सुनंदा पवार व वडील राजेंद्र पवार यांचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे मतदारसंघातील विकासकामांसोबतच सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा याकरिता आमदार रोहित पवार प्रयत्नशील आहेत.

त्यांनी मोठ्या कष्टाने तालुक्यातील कुसडगाव येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र खेचून आणले. या प्रशिक्षण केंद्राचा फायदा मतदारसंघातील तरुणांना मिळावा यासाठी तेथे दाखल होण्याची प्रक्रिया म्हणजेच 'भरती' सोपी जावी याकरिता इच्छुकांना भरतीपूर्व प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. हे आमदार रोहित पवारांनी हेरले व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध केली.

आमदार रोहित पवारांचे हे मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार तरुणाच्या हाताला रोजगार मिळावा. नोकरी मिळावी याकरिताचे विविध 'फंडे' राबवित आहेत. यावेळी त्यांनी मतदारसंघातील बेरोजगारांना पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून तरुणांना रोजगाराचा मार्ग त्यांनी दाखवली आहे. अशा प्रकारचा दुरदृष्टी कोन ठेवून  उपक्रम राबविणारे राज्यातील पहिले आमदार रोहित पवार ठरताहेत.

राज्याच्या विविध भागात उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या वाटा मतदारसंघातील गरजूंना मिळाव्यात याकरिता वर्षभरापासून आमदार रोहित पवारांची धडपड आणि प्रयत्न सुरू आहेत. त्या प्रयत्नांना यश येत आहे. बेरोजगारांच्या हाताला रोजगार मिळतोय अर्थारजनामुळे. कुटुंबाची विस्कटलेली घडी पुन्हा बसतीय.

आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून आणि कर्जत- जामखेड एकात्मिक विकास संस्था आयोजित कर्जत- जामखेड मतदार संघातील १२ वी उत्तीर्ण झालेल्या युवक- युवतींसाठी ऑनलाइन 'पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.

राज्य सरकारकडुन राज्य पोलिस दलात १२ हजार ५३८ जागांची भरती करण्यात येणार आहे. डिसेंबरच्या अखेरपर्यंत ही प्रक्रिया पुर्ण केली जाणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले. संबंधित अधिकारी वर्गाला त्याबाबत सुचनाही दिल्या आहेत. पोलिस भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या युवक युवतींसाठी महाविकासआघाडी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला.

राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत- जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत व जामखेड तालुक्यातील युवक- युवतींना ही मोफत संधी उपलब्ध करण्यात आली आहे. या पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणात लेखी परिक्षा व शारीरिक क्षमता चाचणी अशी तयारी करून घेण्यात येणार आहे. लॉकडाउनच्या काळात लेखी परीक्षेतील मराठी, अंक गणित, बुद्धिमत्ता चाचणी तसेच सामान्य ज्ञान या विषयाचे सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राज्यातील तज्ञ मंडळी या मार्गदर्शन करणार आहेत.

या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी संबंधित युवक-युवतींनी आपली नोंदणी करणे अनिवार्य असुन https://bit.ly/2fuz2P G या लिंकवर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे किंवा उपलब्ध करण्यात आलेल्या QR CODE वरूनही नोंदणी करता येणार आहे.

संपादन : अशोक मुरुमकर