esakal | कोरोना तपासणीच्या माध्यमिक शिक्षकांच्या मागणीला आरोग्य विभागाचा नकार
sakal

बोलून बातमी शोधा

Reject the demand made by the education department regarding the corona investigation

माध्यमिक शिक्षकांना कोविड तपासणीची सक्ती केल्याने, उपजिल्हा रुग्णालयात त्यासाठी गर्दी वाढली आहे.

कोरोना तपासणीच्या माध्यमिक शिक्षकांच्या मागणीला आरोग्य विभागाचा नकार

sakal_logo
By
राजेंद्र सावंत

पाथर्डी (अहमदनगर) : माध्यमिक शिक्षकांना कोविड तपासणीची सक्ती केल्याने, उपजिल्हा रुग्णालयात त्यासाठी गर्दी वाढली आहे. शिक्षक व सामान्य रुग्णांची तपासणी एकत्रितच होते. त्यामुळे रांगेत उभे असणाऱ्यांकडून कोरोना संसर्गाचा धोका आहे. त्याचा फटका शिक्षकांसह शिक्षण विभागालाही बसू शकतो.

त्यामुळे शिक्षकांची तपासणी स्वतंत्र ठिकाणी करण्याची मागणी होत आहे. मात्र, "आमच्याकडे मनुष्यबळ कमी असल्याने, तसेच जागा उपलब्ध नसल्याने सध्या स्वतंत्र तपासणी करणे शक्‍य नाही,' असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. 

तालुक्‍यात रोज सुमारे 200-250 शिक्षक व रुग्णांची कोविड तपासणी उपजिल्हा रुग्णालयात होते. माध्यमिक शिक्षकांना कोरोना चाचणी बंधनकारक केल्याने, दोन दिवसांपासून शिक्षक चाचणीसाठी येत आहेत. मात्र, संशयित रुग्ण व शिक्षकांची तपासणी एकाच ठिकाणी केली जाते. रांगेत उभे राहताना एकमेकांचा संपर्क होऊन कोरोना संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे आमची तपासणी स्वतंत्र जागेत करावी, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. 

उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणारे कोरोनाबाधित रुग्णालयाच्या आवारात येऊन फिरतात. त्यांचाही धोका आहे. कोरोनाबाधितांना रुग्णालयाबाहेर कसे सोडले जाते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

उपजिल्हा रुग्णालयात एकच कोविड चाचणी केंद्र आहे. तेथे शिक्षकांसह तालुक्‍यातून येणाऱ्या रुग्णांची तपासणी करावी लागते. बाहेरच्या जिल्ह्यात काम करणारे काही शिक्षकही तपासणी करण्यास येतात. आम्ही काळजी घेतोय. दुसरीकडे जागा उपलब्ध नाही. शिवाय, मनुष्यबळाची अडचण असल्याने, दोन तपासणी केंद्रे चालविणे सध्या तरी शक्‍य नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढू. 
- डॉ. महेंद्र बांगर 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image