

Ahilyanagar Crime
Sakal
पाथर्डी : पाथर्डी ते कल्याण बसने प्रवास करणाऱ्या पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे दागिने चोरी प्रकरणात बंटी अन् बबलीला पोलिसांनी अटक केली. देवराई येथील अलका मुकुंद पालवे यांच्या पर्समधील १० तोळे सोने व दीड लाखांची रोकड लांबवली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनेतील आरोपी कोमल नागनाथ काळे (रा. पाथर्डी रोड, शेवगाव) व तिचा प्रियकर सुजित राजेंद्र चौधर (रा. निपाणी जळगाव, ता. पाथर्डी हल्ली रा. शेवगाव) यांना अटक केली. दोघांकडून ९ लाख ३५ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.