स्वच्छता अभियानाने प्रजासत्ताक दिन साजरा; यशवंत प्रतिष्ठानचा उपक्रम

Republic Day has been celebrated with a cleanliness drive at Moryachichonre.jpg
Republic Day has been celebrated with a cleanliness drive at Moryachichonre.jpg

सोनई (अहमदनगर) : आदर्श गाव मोरयाचिचोंरे (ता.नेवासे) येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त यशवंत प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान राबवून महात्मा गांधी पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. 

यावेळी कोरोना संसर्ग काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या गटप्रवर्तक मंगल दराडे, आशासेविका रूपाली, स्वयंसेविका सुनंदा कसबे यांचा प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. मोरयाचिंचोरे हे गाव यशवंत प्रतिष्ठानने दत्तक घेतलेले असून अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांच्या प्रयत्नातून येथे एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प करत येथे जलसंधारण, रुग्णालय, वाचनालय सह विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.   

अहिंसेचा संदेश देणारे महात्मा गांधी यांचे सर्वधर्म समभाव, विश्वबंधुता, ग्रामस्वराज्य, ग्रामोद्योग, पर्यावरण या विषयांवरील विचार आजच्या काळातही समर्पक आणि मार्गदर्शक आहेत, असे यावेळी बाबासाहेब दराडे यांनी सांगितले. कार्यक्रमास ग्रामस्थ, विद्यार्थी व प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com