
पारनेर: देशभरातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या लाखो कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य आजही अंधारातच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कमी वेतनावर, कुठलीही सेवा सुरक्षा नसताना आरोग्य सेवा पुरविणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांना पत्र लिहून त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली आहे.