esakal | पावणेपाच लाख विद्यार्थ्यांच्या ‘पोषण’चा प्रश्‍न निकाली; आहाराचे वितरण सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

nutritions

पावणेपाच लाख विद्यार्थ्यांच्या ‘पोषण’चा प्रश्‍न निकाली

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (जि.अहमदनगर) : जिल्ह्यातील सुमारे चार लाख ६३ हजार ९६१ विद्यार्थी गेले पाच महिने पोषणआहारापासून वंचित होते. याबाबत ‘सकाळ’ने आवाज उठवत त्याचा पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागास जाग आली. त्यामुळे नुकताच १०४ दिवसांचा पोषणआहार जिल्ह्यातील विविध शाळांना वितरित करण्याचे काम सुरू झाले आहे. केवळ वाहतूक ठेकेदाराचा वाहतुकीचा करार संपल्याने, गेले अनेक दिवस मुले पोषणआहारापासून वंचित होती. (Resolved-question-of-nutrition-of-students-marathi-news)

१०४ दिवसांच्या आहाराचे वितरण सुरू

शालेय पोषणआहाराबाबत ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर वाहतूक ठेकेदार नेमला गेला. त्यानंतर जिल्ह्यातील शाळांनी डिसेंबर ते एप्रिलअखेर १०४ श्रमदिवसांच्या कालावधीतील पोषणआहाराची आपली मागणी ३० जूनअखेर नोंदविली होती. नुकतेच जिल्ह्यातील विविध शाळांना त्यांच्या मागणीप्रमाणे पोषणआहाराचे वितरण सुरू झाले आहे.

केवळ वाहतूक ठेकेदाराचा करार संपल्याने पहिली ते पाचवीअखेरची सुमारे दोन लाख ७६ हजार १७०, तर सहावी ते आठवीअखेरची एक लाख ८७ हजार ७९१, अशी एकूण चार लाख ६३ हजार ९६१ मुले पोषणआहारापासून गेले पाच महिने वंचित होती. डिसेंबर ते एप्रिलअखेर १०४ श्रमदिवसांच्या कालावधीतील पोषणआहाराची मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा: कर्जत-जामखेडमधील विहिरीखोदाईचा प्रश्न सुटला; मोठी अडचण दूर

सर्वोच्च न्यायालयाने पहिली ते आठवीअखेर एकही मुलगा पोषणआहारापासून वंचित राहता कामा नये, असा आदेश दिला आहे. मात्र, केवळ सरकारी यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे मुलांना आपल्या हक्काच्या पोषणआहारापासून अनेकदा वंचित राहावे लागते. त्यात सातत्याने अनियमितता येते. त्यामुळे वितरणात व वाटपात हेळसांड होताना अनेकदा दिसून येत आहे. आता ठेकेदार नेमल्याने २० दिवसांच्या आत या पोषणआहाराचे शाळांना वितरण होणार आहे. वितरणानंतर तो लगेचच मुलांना शालेय स्तरावर वितरित केला जाणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर व शाळा बंद असल्याने गेल्या काही दिवसांपासून शाळेत पोषणआहार शिजवून देण्याऐवजी तो तसाच धान्याच्या रूपात वाटप केला जात आहे. या वेळी तो तसाच वाटप केला जाणार आहे. आता मुलांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलावून घेऊन त्याचे वितरण केले जाणार आहे.

शिध्याचे वाटप

कोरोनामुळे सुमारे दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्याचा परिणाम पोषणआहार शिजवून देण्याऐवजी फक्त तांदूळ, हरभरा व तूरडाळीचे वाटप मुलांना केले जात आहे.

हेही वाचा: साईसंस्थान विश्‍वस्त निवडीला 2 आठवड्यांची प्रतीक्षा

loading image