esakal | नदीत वाहुन गेलेल्या सेवानिवृत्त पोलिसांचा चौथ्या दिवशी अठरा किलोमीटरवर सापडला मृतदेह
sakal

बोलून बातमी शोधा

Retired police personnel died in Pravara river

प्रवरा नदी पायी ओलांडताना पात्रात वाहून गेलेल्या सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा मृतदेह तब्बल चौथ्यादिवशी पाचेगावपासून सुमारे १८ किलोमीटरवरील वाशिम टोका (ता. नेवासे) येथे प्रवरानदी पात्रात तरंगतांना सापडला.

नदीत वाहुन गेलेल्या सेवानिवृत्त पोलिसांचा चौथ्या दिवशी अठरा किलोमीटरवर सापडला मृतदेह

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : प्रवरा नदी पायी ओलांडताना पात्रात वाहून गेलेल्या सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा मृतदेह तब्बल चौथ्यादिवशी पाचेगावपासून सुमारे १८ किलोमीटरवरील वाशिम टोका (ता. नेवासे) येथे प्रवरानदी पात्रात तरंगतांना सापडला.

सेवा निवृत्त पोलिस मधुकर दादा बर्डे (वय ६१) हे मंगळवारी (ता. २२) दुपारी पाचेगाव (ता. नेवासे)  येथून प्रवरा नदी ओलांडून पात्रातून पायी इमामपूर येथे घरी जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने प्रवरा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली होती.

घटना घडल्यापासून बर्डे यांचा शोध घेण्यासाठी इमामपूर येथील दहा- पंधरा युवकांची शनिवारपर्यंत शोध मोहीम घटना घडली. त्याच परिसरात एक- दोन किलोमीटर सुरु होती. मात्र बर्डे यांचा मृतदेह  घटनास्थळापासून सुमारे ११ किलोमीटरवर असलेल्या वाशिम टोका (ता.  नेवासे) येथे शनिवारी (ता. २६) सकाळी प्रवरा पात्रात तरंगतांना आढळून आला.

पोलिसांकडून बर्डे यांच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर मृतदेह उत्तरीय तापासणीसाठी  नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आल्यानंतर शनिवारी इमामपूर येथे  अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी पाचेगाव येथील राजेंद्र बेहेळ यांच्या खबरीवरून नेवासे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पंधरा दिवसांपूर्वी (ता. ९) सप्टेंबरला अगदी अशीच घटना घडून पाचेगाव येथील बाळासाहेब माळी ही व्यक्ती पाण्याचा अंदाज न आल्याने प्रवरानदीत वाहून गेली होती. दुसऱ्या दिवशी तब्बल सोळा किलोमीटरवर नेवासे येथील मध्यमेश्वर बंधाऱ्यात या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image